श्रीमहाराजांच्या विशिष्ट
गुणांचा अभ्यास केला आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर
आपला प्रपंच उत्तम होईल आणि पारमार्थिक उन्नती साधेल. साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, निरलसता,
संतोष, आर्जव, जनप्रियत्व,
कोणतीही गोष्ट मनापासून करणे, झाल्या-गेल्याचा
विसर, पुढच्याचा विचार आणि व्यवहाराचा परमार्थासाठी उपयोग
(म्हणजे परमार्थ हे ध्येय साधण्यासाठी व्यवहार साधन म्हणून करणे) हे
श्रीमहाराजांचे दहा विशिष्ट गुण त्यांच्या चरित्रात दिलेले आहेत. त्यांचे चिंतन
करून ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. जनप्रियत्व हा त्यांचा आवडता गुण
होता.
*** श्रीमहाराज आपल्या घरी आले, तर आपल्या वागण्यात बदल
करावा लागणार नाही, असे आपले वागणे असावे ***
त्यांचे अस्तित्व आपल्या जाणीवेत आले, तर आपल्या हातून काही वावगे घडणारच
नाही!
No comments:
Post a Comment