Translate

ज्ञानेश्वरी आणि पूज्य बाबा

परमपूज्य बाबा बेलसरे यांनी त्यांच्या आयुष्यात ३ वेळा ज्ञानेश्वरी सांगितली. आपल्या प्रवचनातूनही वारंवार "ज्ञानेश्वरी म्हणजे कमाल आहे!" असे वाक्य उच्चारणारे पूज्य बाबा यांचे ज्ञानेश्वरीचे निरूपण तितकेच ताकदीचे असे यात शंका नाही. आजवर प्रकाशित झालेल्या त्यांच्या ज्ञानेश्वरीच्या खंडांवरून आपल्याला स्पष्ट कल्पना येते की ज्ञानेश्वरी म्हणजे पूज्य बाबांचा प्राण होता! त्यांचे एक वाक्य आहे- नामाच्या अभ्यासाला कोणतीही परिस्थिती चालते. एक लहान झोपडी, एक वेळ साधे पोटभर जेवण, एक श्रीज्ञानेश्वरी आणि एक जपमाळ एवढे असून नाम घेण्याची बुद्धी राहिली तर मी स्वर्गात आहे असे समजेन!यावरून त्यांना या ग्रंथाची किती आवडीहोती हे दिसून येईल. कित्येकदा ते प्रवचनात म्हणत, “एकदा असं वाटतं, या अठरा वर्षांच्या मुलाला बघावं. एवढ्या छोट्या वयात काय प्रचंड ज्ञान! कमाल वाटते!आपण सर्वांनी आवर्जून त्यांची ज्ञानेश्वरीवरील निरूपणाची पुस्तके घेऊन त्याचा अभ्यास करावा व आपली साधना वाढवण्यास त्याचा उपयोग करून घ्यावा! 

तेव्हा या पेज वर काही निवडक ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि त्यांचे पूज्य बाबांच्या रसाळ वाणीतील निरूपण आपण पाहणार आहोत. त्याबरोबरच काही अप्रतिम विचार जे पूज्य बाबांनी ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या निमित्ताने मांडले तेही आपण पाहणार आहोत.

2 comments:

  1. Please update above links to .com, this is not loading the right page due to .in. see corrected link as
    http://bababelsare.blogspot.com/2015/10/blog-post_0.html

    ReplyDelete
  2. Can somebody please guide me to get Dyaneshwari Volume no.8.....thanks.

    ReplyDelete