Translate

Thursday, August 7, 2014

महाराजांचा विशाल दृष्टीकोन! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराजांचा दृष्टीकोन किती विशाल होता याबद्दल मी काय सांगू? एकदा श्रीमहाराजांना विचारले की आपल्याजवळ काही नसताना रोज चार-पाचशे माणसे जेवायची हे कसे? तेव्हा श्रीमहाराज म्हणाले, एक माणूस झोपला होता. त्याच्या उशाशी झरा वाहात होता. झोपून उठल्यावर त्याने त्यातले एक दोन ओंजळी पाणी घेऊन इकडे तिकडे टाकले, तर त्या झ-याच्या वाहण्यात काही फरक पडेल का? तसे सृष्टीमध्ये इतके कोट्यवधी जीव खात आहेत, त्यातली चार-पाचशे माणसे इथे जेवली तर विशेष काय झालं? 

आणि मला सांगायला अभिमान वाटतो की गोंदवल्यात हे कार्य आज देखील अविरतपणे चालू आहे! काय सत्ता आहे त्यांची! 

1 comment:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete