साधनात आपल्या आड काय येते ह्यावर संयम केला तर तो
अडसर दूर करणे शक्य होईल. हा विचाराचा मार्ग आहे. सर्वांना तो साधेल असे नाही.
त्यापेक्षा सतत नामस्मरण करीत राहिल्यास वासना क्षीण होऊ लागतील व चित्त शुद्ध
होऊन साधकाच्या नकळत साधनात येणारे अडथळे दूर होतील. अर्थात ह्यासाठी नामस्मरण
करताना शरणागतीचा भाव पाहिजे.
श्रीमहाराज म्हणत, ओढ्यात खरकटी भांडी भिजत घातली आहेत, एक हात फिरवला की स्वच्छ होतील; हे खरे, पण भांड्यांनी हालचाल न करता ओढ्याच्या पाण्यात भिजत पडले पाहिजे. (सद्गुरूंना शरण जाऊन साधनात राहिले पाहिजे). भांडे जितके जास्त करवडलेले तितके ते जास्त वेळ पाण्यात ठेवावे लागेल. आपल्या चित्तात केवळ पूर्वग्रहच नव्हे तर पूर्वपूर्वग्रह असतात; ते नाहीसे झाले पाहिजेत.

नामात पडून राहता आले पाहीजे
ReplyDelete