Translate

Sunday, August 10, 2014

काळजी करणे सोडले पाहिजे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

महाराजांना आपल्या जवळ राहायला कष्ट होऊ नयेत म्हणून तरी काळजी करणे सोडले पाहिजे. काळजी करायची तर साधनाची काळजी करावी, म्हणजे काळजीचे उदात्तीकरण- sublimation होते. तुकाराम महाराजांनी ते केले. ते म्हणतात- "संतांचा पढियावो कैशापरी लाहो |नामाचा आठवो कैसा राहे |||| हेचि थोर चिंता लागली मानसी | निजता निद्रेसी नलगे डोळा ||||" 

या रीतीने साधन होण्यासाठी विकारांच्या आधीन होता कामा नये. असं ठरवावं सुरुवातीला की आता आठ दिवस तरी विकारांच्या आधीन होणार नाही. हा उत्साह टिकण्यासाठी "चांगला मी" सशक्त केला पाहिजे. सद्गुरूंना आवडते ते केले की मनच गुरु होईल. नाम हा त्यांचा प्राण आहे. तो जपण्यासाठी नाम घेताना सावधानता ठेवली पाहिजे. पुन्हा विकारांच्या आधीन होऊ नये. त्यासाठी थोडी पश्चात्तापाची पार्श्वभूमी हवी. असं वाटलं पाहिजे की त्यांनी माझं इतकं केलं, मग मी थोडं तरी त्यांचं ऋण फेडायला नको का? हे साधण्यासाठी जमत असल्यास साधनात विरोध येईल अशा विचारांच्या लोकात शक्यतो मिसळू नये. 

1 comment:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete