Translate

Saturday, August 9, 2014

रागामुळे परमार्थ बुडतो! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

एकदा श्रीमहाराजांना मी माझा अनुभव सांगितला. राग आला आणि तो शांत झाल्यावर नामाला बसलो तरी नामाची तंद्री लागत नाही. ते म्हणाले, "शक्ती कुठे उरते तंद्री लागायला?" रागामुळे मानसिक शक्ती झपाट्याने घटते. श्रीमहाराजांनी शेतक-याचा दृष्टांत दिला. एक शेतकरी होता. तो मोटेने शेताला पाणी द्यायचा. पाटातून पाणी जायचं. पण पाटामध्ये उंदरांनी खूप बिळे केलेली होती. त्यामुळे खूपसं पाणी बिळातच जायचं. मी तर म्हणतो की त्याशिवाय शेतात नको असलेलं गवत वाढतं. त्यामुळे कष्टाच्या मानानं पीक पदरात पडत नाही. नाम घेतानाही माझ्याकडे अमुक नाही, तमुक नाही या विचारांचं गवत मनात वाढतच असतं आणि त्यामुळे नामाचं पीक वाढत नाही. किंवा 'मी' इतकं नाम घेतो हा अहंकार वाढतो. नाम मोठं नाजूक आहे. नाम घेताना मनात पैशाच्या विचाराची लहर येऊन गेली तरी नामात बिघाड येऊ शकतो. 

1 comment:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete