Translate

Thursday, August 7, 2014

महाराज, मी जे करतोय ते चुकीचे असेल तर मध्ये अडचणी आणा ! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

सत्याचे रूप म्हणजे नाम. श्रीमहाराजांच्या अस्तित्वाचे मला कळणारे रूप म्हणजे नाम. आपली काही अडचण असली, तर चिठ्या टाकण्यापेक्षा श्रीमहाराजांना सांगावे की मी असं असं करतो आहे. ते चुकीचे असेल तर तुम्ही मध्ये अडचणी आणा. म्हणजे मग ते काम झालं नाही तरी तुमचं समाधान टिकेल. समजा, तुमचं हाड मोडलं, तर प्रार्थना करावी की नेहमी माझं जसं नामस्मरण होतं तसं होऊ द्या; समाधान राहू द्या. देहाचं प्रारब्ध भोगताना महाराज समाधान टिकवतील. श्रीमहाराज गेले आणि आजही ते आहेत अशी संमिश्र भावना आपली आहे. श्री. दिनकररावांना (केतकर) श्रीमहाराज म्हणाले, मी गेलो ही भावना नाहीशी कर, म्हणजे मी आहे. नामाच्या साक्षित्वाने जे कर्म घडेल, ती त्यांची इच्छा आणि प्रपंचामध्ये समाधान टिकणे ही त्याची प्रचीती! 

No comments:

Post a Comment