Translate

Sunday, August 3, 2014

शरणागतीची पहिली पायरी ~ पूज्य बाबा बेलसरे

जिवाने मारलेली हाक ईश्वरापर्यंत पोचण्यास काय करावे? जीव आणि ईश्वर दोघे अनादि आहेत. शिवाय दोघे एकमेकांचे सखे आहेत. जेथे जीव आहे तेथे ईश्वर असतो आणि जेथे ईश्वर आहे तेथे जीव असतो. असे जरी असले तरी जीव जोपर्यंत ईश्वराला विसरलेला असतो तोपर्यंत त्याच्या अंतरी एक उणेपणाची जाणीव राहते. त्या उणेपणाचे रूपांतर कर्तेपणाच्या व्यर्थपणात झाले की जीव व्याकूळ होउन ईश्वराला मनापासून हाक मारतो. ती जीवाची हाक ईश्वरापर्यंत पोचते. आपले कर्तेपण व्यर्थ आहे ही जाणीव होणे हे जीवाचे अध्यात्म जागे झाल्याची खूण आहे. "माझे कर्तेपण खरे नाही, ईश्वराचे कर्तेपण खरे आहे. म्हणून ईश्वर करील तेच होणार" ही मनाची पक्की धारणा होणे म्हणजे शरणागतीची पहिली पायरी चढणे होय. 

2 comments:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete
  2. ||श्रीराम जयराम जय जय राम ||

    ReplyDelete