Translate

Tuesday, August 12, 2014

प्रपंच उणे आसक्ती = परमार्थ! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

प्रपंच उणे आसक्ती बरोबर परमार्थ असे समीकरण मांडता येईल. म्हणजे, असक्तीविना केलेला प्रपंच हा परमार्थच होय. हे करताना आपल्या काही मुख्य चुका होतात- आपण प्रपंचात गुंततो आणि देण्या-घेण्यात फार गुंतून राहतो. प्रपंचातही नवरा, बायको, मुले बाळे, इतर नातेवाईक हे आपले समकालीन असतात. आपण त्यांना काही मागितलेलं नसतं. प्रारब्धाने म्हणा किंवा भगवंताने म्हणा ते आपल्याला दिलेले असतात. त्यांचे आणि आपले संबंध हे accidents असतात; ते तात्पुरते असतात. फक्त श्रीमहाराजांचा संबंध हा चिरंतन संबंध आहे. श्रीमहाराजांनी विश्वनाथ म्हणून एकांना पत्रात लिहिले होते की, तुम्हाला आई नाही, बाप नाही, बंधू नाही, पण मी आहे! म्हणून शरण जाऊन श्रीमहाराजांना सांगावं, की आता मला तुमच्याशिवाय कोणी नाही. प्रपंचातले प्रेम, आसक्ती काढायला मला मदत करा असं त्यांचं आवाहन करावं. बाह्यात्कारी प्रपंचात प्रेम करावं; पण आत गुंतलेलं नसावं. श्रीमहाराजांखेरीज (सद्गुरुंखेरीज) माझे कोणी नाही अशी आत खात्री असावी. 

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete