Translate

Sunday, August 3, 2014

कर्म शुद्ध होऊन समाधान कसे राहते? ~ पूज्य बाबा बेलसरे

महाराजांना म्हणावं, आता बुद्धीची वाढ खूप झाली. आता थोडा तुमच्या प्रेमाचा स्पर्श होऊदे. हे होण्यासाठी त्यांच्याजवळ रडावं. "धोए गए हम इतने की बस पाक हो गए" असं झालं पाहिजे. "कंठी राहो नाम हा माझा नवस" यामध्ये प्रार्थनेची सगळी अंगं आहेत. बौद्धिक अंग आहे, अध्यात्मिक अंग आहे आणि प्रेमाचं अंग आहे. श्रीमहाराजांचे भजन पूजन आपण करतो आहोत म्हणजे कसं पाहिजे, तर त्यांची प्रार्थना करताना थोडं तरी हृदय हललं पाहिजे! आपल्यासारख्यांना श्रीमहाराजांनी जवळ केलं आहे, यापेक्षा आणखी उदारता ती काय? तारी तारी रे रामराया | गेला गेला जन्म वाया || हे आपण शिकलं पाहिजे. त्यांच्या अस्तित्वाच्या भावनेचं पोषण झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट करताना महाराज मी हे आपल्यासाठी करतो आहे अशी त्यांची प्रार्थना करावी. म्हणजे मग जे आपण केलं ते त्यांच्या साक्षीनं केलं ही जाणीव राहते. त्यामुळे कर्म शुद्ध होऊन समाधान राहतं असा माझा अनुभव आहे. 

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete