Translate

Tuesday, August 5, 2014

साधनेला सद्गुरूंचे अधिष्ठान हवे! ~ पूज्य बाबा बेलसरे


माझे नामस्मरण चांगले झाले किंवा आता मी इतरांपेक्षा बरा साधक आहे, असे विचार मीपणामुळे येतात आणि ते साधकाला खाली खेचतात. नामस्मरणाच्या प्रगतीतच अहंकारामुळे खाली येण्याची भीती अंतर्भूत आहे, म्हणून ते सांभाळले पाहिजे. मी चा उपयोग करूनच मी ला बाजूला सारायचे आहे. नामस्मरणामुळे शक्ती वाढू लागते. ती शक्ती एक तर प्रपंचातल्या क्षुद्र वासना पु-या करण्यात खर्ची पडते, नाहीतर सात्विक अहंकार वाढू लागतो. याला उपाय म्हणजे, मी नाम घेतो ते सदगुरूंकडून आलेले नाम घेतो, तेच माझे साधन करवून घेतात हा भाव सुरुवातीपासून वाढवावा. त्यांच्या कृपेने मी साधन करतो, हे कळण्यातच त्यांची कृपा आहे. अजून एक म्हणजे, जे होणार ते सर्व ठरलेले आहे हे लक्षात ठेवावे; त्यात माझे नामही आले. नाम चांगले झाले तर ते त्या नियतीमुळे- सद्गुरुंमुळे झाले अशी मनाची समजूत करून घेतली पाहिजे, तरच मी केले किंवा मी करतो हा अहंकार कमी होईल. याने सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक शुद्धता होईल. 

1 comment:

  1. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete