Translate

Tuesday, August 12, 2014

श्रीमहाराजांच्या घडविण्याला आपण सहकार्य केले पाहिजे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराज आपल्याला घडवीत आहेतच. आपणही आपल्याकडून त्यांना सहकार्य केले पाहिजे. श्रीमहाराज म्हणायचे, 'एखादा चांगला मुलगा असेल तर शाळेमध्ये त्याला एकदम वरच्या वर्गात घालतात. तसेच मी करतो. तुम्ही अभ्यास केलात तर डबल प्रमोशन देतो (परमार्थात).' त्यांचा कुठेतरी स्पर्श झाल्याशिवाय हे होणार नाही. महाराजांचे- नामाचे प्रेम यावे यासाठी नामस्मरण करीत वाट पाहत राहणे एवढेच आपण करू शकतो. ह्या वेटिंग पिरीयड मध्ये चिकाटीची फार आवश्यकता आहे. सुरुवातीला थोडे कंटाळवाणेपणा आहे. श्रीमहाराजांवर - नामावर प्रेम करणे हे दृश्यावर प्रेम करण्यासारखे सोपे नाही. ते देतील तेव्हाच प्रेम येईल. म्हणून ते प्रेम द्या अशी तळमळून प्रार्थना करावी. "प्रेम देवाचे देणे | देहभाव जाय जेणे ||" श्रीमहाराजांचे प्रेम यायला एक उपाय म्हणजे त्यांची आतली संगत घडली पाहिजे. आतमध्ये सारखे त्यांच्यासंबंधीचे विचारच घोळत राहिले पाहिजेत. 

1 comment:

  1. श्रीराम जय राम जय जय राम

    ReplyDelete