साधुसंतांचा असा प्रत्यक्ष अनुभव आहे की, नीतिनियमांचे कडक रीतीने पालन झाल्यावाचून स्वानंदाचा अनुभव घेण्यास पात्र असणारे मन तयार होत नाही. म्हणून सर्व धर्मांमध्ये जे सामान्य नीतिनियम सांगितले आहेत, त्यांचे पालन झालेच पाहिजे. त्यापैकी पुढील तीन नियमांना अपवादच नाही. तेथे तडजोड नाही:
१) पुरुषाला परस्त्री व स्त्रीला परपुरुष सर्वकाली सर्व ठिकाणी पूर्णपणे वर्ज्य.
२) परद्रव्य, म्हणजे ज्या द्रव्यावर आपला कोणताही हक्क नाही व ज्यासाठी आपण कोणतेही श्रम केलेले नाहीत, ते सर्वथैव वर्ज्य.
३) परनिंदा सर्वथैव वर्ज्य.
कितीही नाम घेऊन सुद्धा नामाचा अनुभव येत नाही असे सांगणारे मला अनेक लोक भेटतात; त्यांना मी हेच सांगीन की हे नियम काटेकोरपणे पाळले जातात की नाही याची स्वतःच स्वतःपाशी चौकशी करावी. तुमचे उत्तर तुम्हालाच मिळेल. म्हणजे घेतलेले नाम वाया जाते असे नक्कीच नव्हे; परंतु, नामामध्ये पूर्णत्व येण्यासाठी मनाची जी सूक्ष्मता आहे ती या नियमांचे पालन केल्यावाचून येणे शक्य नाही.

श्रीराम जयराम जयजयराम
ReplyDelete