गुरुचे वाक्य हे वेदवाक्य झाले पाहिजे. त्याच्यापुढे काही नाही.
भाऊसाहेब केतकर असे होते. त्यांना हर्नियाचा त्रास होता. महाराज देहात असताना
त्यांनी विचारलं की 'मी याचं
ऑपरेशन करून घेऊ का?' तर महाराज
त्यांना म्हणाले, 'नको
भाऊसाहेब. काही जरूर नाही, आपल्या आड
हे यायचं नाही.'
जेव्हा ते सत्याऐंशी वर्षांचे होते, तेव्हा त्यात Strangulation झालं. त्यात आतड्याला पीळ पडतो असं म्हणतात. एका डॉक्टरला बोलावलं तर तो म्हणाला, 'यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवा. नाहीतर हे एका तासाच्यावर जगणार नाहीत. भाऊसाहेब मला म्हणाले, काय म्हणतो डॉक्टर? मी त्यांना सांगितलं तर मला म्हणाले, 'महाराजांच्या कानावर घाला म्हणजे आपली जबाबदारी संपली.'
मी तसबिरीपुढे उभा राहिलो आणि महाराजांच्या कानावर घातलं. त्यांच्या पोटावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवीत होते. त्या दिवशी जेवणं लवकर आटोपून घेतली. रात्री नऊ साडेनवाच्या सुमाराला त्यांनी मला हाक मारली आणि म्हणाले, "आता स्वारी आली होती. हातात काठीसारखं काहीतरी होतं. मला म्हणाले, 'भाऊसाहेब, काय झालं आहे?' मी त्यांना म्हटलं, 'हर्नियाचा त्रास होतो आहे.' तर महाराज 'बघू' म्हणाले. हे अर्धवट झोप-स्वप्न अशा अवस्थेत होते. जागे झाले तर हर्निया पूर्ववत झाला होता. पुढे ते सहा वर्षे जगले. त्यांना त्या वेळी प्राणांतिक वेदना होत होत्या, प्राण जायची वेळ आली होती. मी त्यांना म्हटलं, ' भाऊसाहेब, तुमच्या मनात आलं नाही का की महाराज असं कसं बोलले की हे आपल्या आड यायचं नाही?' तर अगदी साधेपणाने ते मला म्हणाले, 'नाही बुवा, माझ्या मनात नाही आलं!' याचं नाव श्रद्धा! कशाला पुस्तकात शोधायला जाता?
श्रीराम जयराम जयजयराम
ReplyDelete