Translate

Tuesday, August 12, 2014

नाम चालू असता जे घडेल त्याची जबाबदारी महाराजांची! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

नाम चालू असतांना ज्या गोष्टी घडतात त्या श्रीमहाराजांच्या साक्षीने घडतात; नाम चालू असताना ज्या गोष्टी घडतात त्यांची जबाबदारी माझी असे त्यांनीच सांगितले आहे. म्हणून सतत नाम घेतले तर संपूर्ण जबाबदारी त्यांची होईल. स्वाभाविकच त्यासाठी नामाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. नेहमीची कर्मे करताना नाम टिकले तर नाम चांगले चालण्यासाठी वेगळे कष्ट नकोत. उदाहरणार्थ, स्नान, जेवण इत्यादी करताना नाम टिकले पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला प्रयत्नपूर्वक नाम घ्यावे लागेल. अप्रिय घटनांत आणि सुखाच्या परिस्थितीत नामस्मरण करायचा अभ्यास केला पाहिजे. आज आपली श्रद्धा- खरे म्हणजे विश्वास दृश्यामध्ये आहे, ती अदृश्यात किंवा सूक्ष्मात गेली म्हणजे मग कोणताही प्रसंग आला तरी समाधान राहील. "त्यांची इच्छा" अशी प्रतिक्रिया आली पाहिजे- नव्हे तो स्वभाव झाला पाहिजे! 

3 comments:

  1. What is first, BELIEF OR EXPERIENCE? Without experience, may it be for a fraction of second, how can I trust / believe anything? CHAMATKARASHIVAY NAMASKAR KASA GHADOO SHAKTO?
    Please help me answer my inner queries..Pl. reply at ajitbmunj@gmail.com

    ReplyDelete
  2. श्रीराम! Of course belief is first! श्रद्धेशिवाय परमार्थ नाही. त्यासाठी संत सद्गुरू जे सांगून गेले ते आत्मप्रचीतीचे आहे यावर विश्वास हवा. तो कसा ठेवावा हा प्रश्न चुकीचा नक्कीच नाही आजच्या विज्ञान युगात. परंतु, एके ठिकाणी पूज्य बाबा बेलसरेंनी याचे उत्तर देऊन ठेवले आहे. ते म्हणतात, संत ज्ञानेश्वर, तुकोबा, समर्थ, एकनाथ महाराज आणि महाराजांसारखे संत जे अतिशय नीतिमान जीवन जगले त्यांना चुकीचे सांगून काय मिळणार होते? ते नीतिमान होते यात तर आपल्याला शंका नाही. आणि दुसरे म्हणजे स्वतः कष्ट सोसून समाजाला आत्मबोधाचा मार्ग दाखवण्या मागे त्यांचा स्वार्थ काय होता? किंबहुना त्यांना अतिशय मानहानी सोसावी लागली, तरी त्यांनी आपले सांगणे सोडले नाही कारण तेच एक शास्त्र शुद्ध सत्य होते!

    ReplyDelete
  3. श्रीराम जयराम जयजयराम

    ReplyDelete