वेदांतामध्ये प्रातिभासिक, व्यावहारिक आणि पारमार्थिक अशा तीन सत्ता मानतात. मी श्रीमंत, विद्वान व मोठा आहे, लोकांनी
मला मान द्यावा, इत्यादी आपण आपल्या कल्पनेने लादलेल्या गोष्टी हे
प्रातिभासिक सत्तेचे स्वरूप आहे. हा एक प्रकारचा भ्रमच असतो. पुष्कळ पैसा मिळवून
आजपर्यंत कोणी खरा सुखी झाला नाही, हे
प्रत्यक्ष पाहून देखील आपण पैशासाठी सर्व आयुष्य वेचतो. याला भ्रम नाही तर काय
म्हणावे! आशेची बेसुमार वाढ हे प्रातिभासिक सत्तेचे खरे लक्षण आहे.
व्यावहारिक सत्तेमध्ये मनुष्य डोळे उघडून जगाकडे पाहतो. स्वतःच्या जीवनात जगाविषयी आलेले अनुभव डोळ्यापुढे ठेवून मनुष्य वागू लागला, म्हणजे त्याला जीवनाचे खरे स्वरूप आकलन होऊ लागते. उदा.- जगातील लहान मोठे अनेक जीव मृत्यू पावलेले पाहून आपण एक दिवस जाणार अशी खरी जाणीव उत्पन्न होणे हे व्यावहारिक सत्तेचे लक्षण आहे. त्याचप्रमाणे मी अपूर्ण आहे, माझे कर्तेपण लटके आहे, देह मला खरे सुख देणार नाही, लोक मला अज्ञानाने चांगला म्हणतात, इत्यादी निश्चय होणे, हीदेखील त्याचीच लक्षणे समजावीत.
पारमार्थिक सत्तेमध्ये वासना नाहीशी होऊन देहबुद्धी जळून जाते. मी कालातीत आहे, मी आत्माच आहे, असा साक्षात अनुभव आल्यामुळे माणसाच्या जीवनाला निराळेच तेज चढते. सांगण्याचा मुद्दा हा की साधकाने प्रातिभासिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये उतरायचे असते आणि तेथे न थांबता पुढे पारमार्थिक सत्तेत चढायचे असते.

No comments:
Post a Comment