भगवान रमण महर्षींना एकदा विचारले, मनाची शक्ती म्हणजे काय? तेव्हा ते म्हणाले, भगवंताच्या अनुसंधानाच्या आड जे येते त्याला बाजूला सारणे ही मनाची शक्ती. हे कशाने साधेल असे विचारल्यावर म्हणाले, मनाचे न ऐकण्याने!
श्रीमहाराजांशी एकदा यासंबंधी बोलणे झाले. ते म्हणाले, काहीही झाले तरी नामाचा हट्ट सोडू नये. मी म्हणालो, हे कशाने साधेल? ते म्हणाले, त्यासाठी नाम माझ्या हिताचे आहे ही जाणीव पाहिजे. मी विचारले की ही जाणीव कशी होईल? तेव्हा ते म्हणाले, हट्टाने नाम घेण्याने. हे कशाने साधेल म्हणून विचारल्यावर म्हणाले, त्याचा अनुभव घेऊनच पाहावा!
||श्रीराम जयराम जय जय राम||
ReplyDeleteअप्रतीम
||जय श्रीराम||
Deleteश्रीराम जयराम जयजयराम
ReplyDelete