श्रीमहाराजांना जनाबाईची हा अभंग फार आवडे.
जिव्हा लागली नामस्मरणी | रित्या मापे भरी गोणी ||
नित्य नेमाची लाखोली | गुरु आज्ञेने मी पाळी ||
मज भरवसा नामाचा | गजर नाम्याच्या दासीचा ||
विटेवरी ब्रह्म दिसे | जनी त्यासी पहातसे ||
श्रीमहाराज सांगत, या जनाबाईने- नामदेवांच्या मोलकरणीने नामस्मरण केले आणि तिचे पोते म्हणजे जीव - देह नामाने भरून गेला. आपणही नामस्मरण करतो, मग आपले पोते का भरत नाही? श्रीमहाराज म्हणाले, तिचे माप रिकामे होते त्यामुळे त्यामध्ये नाम भरले जात होते. आपले माप म्हणजे चित्त आधीच वासना विकारांनी भरलेले आहे. त्यामुळे घेतलेले नाम त्यामध्ये वाहून जाते. गोणीत टाकायसाठी मापात काही राहातच नाही. म्हणून हा देह जर नामाने भरावा असे वाटत असेल, तर प्रथम माप रिकामे केले पाहिजे. म्हणजे चित्त शुद्ध झाले पाहिजे आणि गम्मत अशी की हे सुद्धा नामस्मरणानेच साधेल.

No comments:
Post a Comment