Translate

Saturday, August 9, 2014

जीवनाचे लगाम सद्गुरूंच्या हाती द्यावे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराज म्हणत, अर्जुनाने जसे आपल्या रथाच्या घोड्यांचे लगाम कृष्णाच्या हाती दिले, तसे आपल्या जीवनाचे लगाम सद्गुरूंच्या हाती द्यावे. ते करतील ते! सद्गुरू काय किंवा भगवंत काय ते कधी वाईट करणारच नाहीत. ज्याने अर्जुनाला एवढ्या रणांगणात सुरक्षित ठेवले, त्याला तुमचा दरिद्री संसार का सांभाळता येणार नाही? पण निष्ठा पाहिजे. "दिलं तुला" असं वाटलं पाहिजे आणि हे देणं मनाचंच आहे! 






No comments:

Post a Comment