Translate

Sunday, August 31, 2014

A New Page of the Blog

Hello!

||Shreeram Samarth||

Today a new page has been added to the blog -
Spiritual Definitions (व्याख्या).

The aim of this page is to add various descriptive yet to the point definitions of some spiritual terms that we read at various places but fail to exactly comprehend the meaning.

It was a definitive forte of Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj to state such deep sentences that were Vedantic in truth, in a very subtle and comprehensible manner. I wish all the readers including those from different countries other than India, should reap the benefit of this blog and its content; so that bilingual (Marathi and English) definitions.

I earnestly wish all the readers are benefited and experience the divinity in the hustle bustle of daily life with these spiritual quotes by Shri Maharaj!

||Shreeram Jay Ram Jay Jay Ram||

Tuesday, August 26, 2014

दासबोधात वर्णन केलेले सद्गुरु लक्षण ~~ परमपूज्य बाबा बेलसरे

दासबोधात वर्णन केलेले सद्गुरु लक्षण -

~~ परमपूज्य बाबा बेलसरे


n  सर्व विश्वाला भगवंताची अगाध लीला समजतात ते सद्गुरू.
n  सर्व प्राणीमात्रांना आत्मस्वरूपाने मीच आहे या आपलेपणाने अनुभवतात ते सद्गुरू.
n  जगातील दीन व दुःखी जीवांबद्दल ज्यांना अत्यंत करुणा वाटते ते सद्गुरू.
n  जगातील कोणतीही वस्तू आपल्याला हवी असे चुकून सुद्धा ज्यांना वाटत नाही ते सद्गुरू.
n  अखंड अभयता अनुभवल्यावर जे निरंतर प्रसन्न असतात ते सद्गुरू.
n  सुखात वा दुःखात, संपत्तीत वा विपत्तीत, मानप्रसंगी वा अपमानप्रसंगी, देहादुह्खात आणि दारिद्र्यात, आजारीपणात आणि अगदी अंतकाळी ज्यांचा भगवंतावरील भरोसा अगदी जशाच्या तसा सतेज राहतो ते सद्गुरू.

अशा सद्गुरूंचा सहवास भाग्याने लाभतो. पण ज्याला तो लाभतो, त्याचे मन आमूलाग्र बदलते. त्याचे अज्ञान विरळ होत जाते आणि संशय व विक्षेप मरून जातात.

सद्गुरुवर खरे प्रेम करता आले, तर आणखी काही साधन करण्याची जरूर नाही. अगदी मनापासून त्याचे होऊन राहावे, त्याचे मनापासून ऐकावे, त्याने दिलेले नाम घ्यावे आणि जे जे जीवनात घडेल त्यांमध्ये त्याचा हात आहे हे ओळखून समाधान ठेवावे, हाच समर्थांचा परमार्थ आहे!  

Monday, August 25, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १०-

नाम –

१०) तुकारामबुवांची वाचा त्यांना अनावर झाली, ती सारखे नाम घेऊ लागली. याचा अर्थ असा की त्यांच्या कल्पनेच्या बाहेर नाम येऊ लागले. आपल्या शक्तीच्या बाहेर कार्य होणे ही भगवंताची कृपा होय. गाडी उतरंडीला लागली की जशी अति वेगात येते आणि आवरत नाही, तसे हे आहे.

~~ श्रीराम. नामाचा उद्रेक अशी ही स्थिती आहे! “अमृताची उकळी नाम तुझे” म्हणणारे तुकोबा नामात रंगून जातात यात नवल ते काय? आपल्या भारतात होऊन गेलेल्या जवळ जवळ सर्व संतांनी नामाची महती वर्णिली आहे. नाम म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच नाम- ही भावना जेव्हा साधकाच्या मनात दृढ होईल त्या दिवशी नाम घ्यावे लागणार नाही तर नाम आपोआप ओठी येईल असे संत सांगतात. भक्तिरसात बुडालेला भक्त आत्यंतिक प्रेमाने फक्त भगवंताला आर्त स्वरात हाक मारतो आणि ही हाक म्हणजेच त्याचे नाम! अशी हाक मारल्यावर तो भगवंत त्याचे कोड-कौतुक पुरवतो—त्याला परमार्थ मार्गात हात धरून पुढे घेऊन जातो.

वाचा अनावर होऊन नाम येणे ही अवस्था कान्हनगडचे स्वामी रामदास सुद्धा वर्णन करतात. ब्रह्मानंद महाराजांना जेव्हा त्यांचे पुतणे भीमराव यांनी विचारले, तुम्ही इतके शास्त्रपठण केलेले; मग तुम्ही इतके नाम कसे काय घेऊ शकलात? यावर ब्रह्मानंद महाराजांनी फार सुरेख उत्तर दिले आहे. ते म्हणाले, काही वेल भरमसाठ वाढतात. तसे जो कोणी मनापासून नामाला चिकटतो, त्याला नामच हात देते आणि शक्तीबाहेर नाम वाढत जाते. ती शक्ती वरील वचनात म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष भगवंताची शक्ती असते.


जो साधक दृश्य विश्वाला बाजूला सारून व सद्गुरूंना शरण जाऊन अखंड नामात राहण्याचा प्रयत्न करतो, त्याला सद्गुरूच हात देतात. हेच सद्गुरूंचे ‘function’ आहे असे गुरुदेव रानडे म्हणत. हे साध्य होण्यासाठी गुरुदेव रानडेंनी दिलेला मंत्र मला फार उपयोगी पडला असे परमपूज्य बाबा बेलसरे मुद्दाम सांगतात- ते म्हणाले, “मी सुरुवात १० मिनिटांपासून केली आणि रोज १ मिनिट वाढवले. महिन्याभरात अर्धा तास वाढला!” याप्रमाणे प्रयत्न आणि सद्गुरू कृपा यांचे फळ म्हणजे वर विषद केलेला अनुभव! 

Sunday, August 24, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ९ --

नाम –

९) एक मनुष्य बैलगाडीमधून जाताना रस्त्यामध्ये पडला. एका सज्जन माणसाने त्याला तेथे पडलेला पाहून उचलला आणि आपल्या घरी नेला. तसे नुसते विषयात राहणे हा आड मार्ग आहे, नामात राहणे हा सरळ मार्ग आहे. आपण भगवंताच्या नामात पडून राहावे. त्यात राहिले की कोणीही संत भेटतो आणि आपले काम करतो. आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे.

~~ श्रीराम. सत्पुरुषाची भेट ही आयुष्यातली सामान्य घटना नव्हे. किंबहुना आयुष्यातल्या अनेकानेक घटनांपैकी या घटनेचा सर्वात महत्त्वाची व शुभ असा उल्लेख करणे प्राप्त आहे. मनुष्य जेव्हा परमार्थ मार्ग आक्रमण्यास सुरुवात करतो, तेव्हा परमात्म-दर्शन ही त्याची ओढ असते, शाश्वत शांती आणि अखंड समाधान हे त्याचे ध्येय असते. हे साध्य होण्यासाठी शिष्याने सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनात कोणताही विकल्प न बाळगता राहणे हा एकच पर्याय आहे. सद्गुरू-कृपा होणे हे त्यामुळेच शक्य आहे. नाहीतर नाही.
                   
वरील बोधवचनातून अजून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे, जरी अजून सद्गुरू भेट झाली नसेल, अनुग्रह प्राप्ती झाली नसेल, तरी सज्जन व्यक्तीने निराश होण्याचे कारण नाही. जर आपण मनापासून आणि अत्यंत तळमळीने भगवंताच्या नामात राहिलो आणि विवेकपूर्वक चांगल्या गोष्टीच आचरणात आणल्या, तर संत तुम्हाला शोधत येतील, हे महाराजांचे आश्वासन आहे. भक्ताला जशी भगवंताची ओढ असते, तशीच किंबहुना त्याहूनही जास्त ओढ भगवंताला सद्भक्ताची असते. संतांना- सत्पुरुषांना देखील साधनात तत्पर असणाऱ्या शिष्यापेक्षा दुसरा कोणी प्रिय असूच शकत नाही. “आपण सरळ मार्गात मात्र पडले पाहिजे” हे वाक्य सर्वात महत्त्वाचे आहे. मी काहीही करीन आणि संताने मला आपला म्हणावे हे शक्य नाही. तरीदेखील ते आपला म्हणतात कारण त्यांची करूणाच अपरंपार असते. परंतु, एक साधक-शिष्य म्हणून आपले काही कर्तव्य आहे की नाही? आणि जर अखंड समाधानाचे ध्येय डोळ्यांसमोर कायम असेल, तर साधक साधनात - नामात राहीलच. त्याशिवाय त्याला चैन पडणार नाही.


तेव्हा साधकाने “जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे” या समर्थांच्या ओळी सतत स्मराव्या आणि तसे आपले आचरण शुद्ध आणि पवित्र राहावे यासाठी सद्गुरूंची प्रार्थना करावी! जो कोणी मनापासून नाम घेईल त्याला हे साधेल यात शंका नाही! 

Friday, August 22, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ८ –

नाम –

८) इतर साधनांनी लवकर साधल्यासारखे वाटेल, पण ते तात्पुरते असते. नामाने थोडा उशीर लागेल, पण जे साधेल, ते कायमचे साधेल, कारण नामाने मुळापासून सुधारणा होते. 

~~ श्रीराम. एखादा मनुष्य परमार्थाला लागला म्हणजे नेमके काय? तर दृश्य जगाचे मिथ्यापण कोणत्या ना कोणत्या कारणाने मनावर ठसल्यामुळे तो अदृश्य ईश्वराप्रत चालला किंवा जाऊ घातला. किंवा जर गतजन्माच्या पुण्यायीने सद्गुरू भेट आयुष्यात लवकर झाली तर त्यांच्या सांगण्यावर पूर्ण विश्वास ठेवून तो त्याची कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करू लागला की तो परमार्थी बनला. ह्या परमार्थ मार्गावर टिकून राहण्यासाठी सद्गुरू साधन सांगतात. ज्या ज्या माणसाची जशी जशी अध्यात्मिक तयारी असेल त्याप्रमाणे गुरु मार्गदर्शन करतात. परंतु, आत्ताच्या यंत्रयुगात ईश्वर-सन्मुख बनण्यासाठी सर्वोत्तम साधन श्रीमहाराजांनी सांगून ठेवले आहे आणि ते म्हणजे भगवंताचे नाम!

योग / ध्यान इत्यादी साधने देखील ईश्वर-सन्मुख बनवतात ह्यात शंका नाही; परंतु, या मार्गांमध्ये मनुष्याला अतिशय मर्यादाशील जीवन जगणे आवश्यक असते. म्हणजे या इतर साधनांची सुरुवात आधी स्वतःला सुधारण्यात आहे आणि हे किती कठीण काम आहे हे आपण जाणतोच आणि योग वगैरे साधने सुरु केल्यावर घसरण्याची शक्यता जास्त; म्हणजेच ह्यात चढ-उतार जास्त आहेत.

नामाचे महत्त्व कशात असेल तर नामामुळे हे “ईश्वर-सन्मुख होण्यास आवश्यक असलेले बदल” सहजच घडतात आणि साधकाने जर मनापासून सद्गुरू-निष्ठेने नाम जपले तर हे Positive Changes कायमचे असतात. मनुष्याचे अंतरंग सुधारण्याची जबरदस्त ताकद सद्गुरूंनी दिलेल्या नामात आहे. किंबहुना महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे की आपल्या अवगुणांची जाणीव होणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि ही जाणीव सतत नियमाने नाम घेत गेल्याने होते. त्यामुळे नामसाधक साहजिकच सद्गुरुकडे आपले अंतरंग सुधारण्याची वरचेवर प्रार्थना करतो. सद्गुरू-कृपेने आणि नामसाधनेने हे सहजच घडून येते. परंतु, साधकाने आत्यंतिक निष्ठेने नामात राहिले मात्र पाहिजे.


एक सुरेख गोष्ट महाराज सांगत. नामसाधना ही आईसारखी आहे. जर पोर रडवेले, घाणीत बरबटलेले असेल तरी आई त्याला जवळ घेते, कुरवाळते, अंघोळ घालून स्वच्छ करते. मात्र योगसाधना बापासारखी आहे. ती म्हणेल, आधी स्वच्छ होऊन ये! तेव्हा असे हे नाम जर सतत घेतले – घेण्याचा प्रयत्न केला तर सद्गुरूंना आवडेल ह्यात शंका नाही. पूज्य बाबा बेलसरे म्हणत, “प्रेम असो वा नसो, जो कोणी मनापासून नाम घेईल, त्याला महाराज पोटच्या पोराप्रमाणे सांभाळतील!” यापरते दैव ते कोणते?   

Thursday, August 21, 2014

आध्यात्मिक निरोगीपण म्हणजे काय? ~ परमपूज्य बाबा बेलसरे

शरीराचे जसे निरोगीपण असते, तसे मनाचे किंवा अध्यात्मिक सुद्धा निरोगीपण असते. ज्या प्रमाणात हे निरोगीपण वाढेल, त्या प्रमाणात माणसाची भीती, काळजी. चिंता इत्यादी कमी होत जातील आणि त्याच्या मनाला निरोगी स्वस्थता (तामसी आळस नव्हे) येईल. "असू दे" असे वाटू लागेल. जे घडते आहे ते त्याच्या इच्छेने घडते आहे आणि ते माझ्या हिताचेच आहे, अशी मनाची खात्री होईल. चिंता, भय इत्यादी कमी होणे हे अध्यात्मिक उंची वाढल्याचे लक्षण आहे. 

श्रीमहाराजांचे बोधवचन ७ -

नाम -

७) नाम उपाधिरहित असल्यामुळे आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. 

~~ श्रीराम. "नाम घेणे" आणि "नाम येणे" यात थोडासा फरक आहे. सुरुवातीला जेव्हा साधक सदगुरूंकडून नामानुग्रह प्राप्त करतो, तेव्हा तो एक नियम पाळायचा म्हणून नाम घेतो. हे महत्त्वाचेच आहे यात शंका नाही. असे नियमाचे नाम घेता घेताच हळू हळू साधकाला सद्गुरु कृपेने नामात रमण्याची कला अवगत होते. मग नाम घ्यावे लागत नाही तर ते आपोआप ओठी येते; किंबहुना नामाला बसण्यास वेळ झाला नाही तर जीवाची तळमळ होते. हे नामाचे प्रेम थोडे तरी उत्पन्न झाल्याने होते यात शंका नाही.  परंतु, खरेखुरे नामाचे प्रेम येण्यास "देहेबुद्धि ते आत्मबुद्धि करावी" हे समर्थ-वचन सदा नजरेसमोर असावे. 

ही देहबुद्धि सांडणे म्हणजेच उपाधिरहित होणे होय. उपनिषदात साधन-चतुष्टय वर्णिले आहे. आत्मानात्म विवेक, वैराग्य, तितिक्षा आणि नीती या भक्कम आधारावर हे चतुष्टय उभे आहे. हे जोवर मनापासून आत्मसात केले जात नाही, तोवर प्रेम येण्यास उशीर लागेल असे पूज्य बाबा बेलसरे देखील अनेक ठिकाणी सांगतात. हे अंगी बाणण्यास-मुरण्यास सुरुवात होणे ही उपाधिरहित होण्याकडे वाटचाल आहे असे समजण्यास हरकत नाही. अनेक लोक ह्या देखील उपाधीच आहेत असा पक्ष मांडताना दिसतात. परंतु, इथे साधकाने एक लक्षात घेतले पाहिजे की ह्या उपाधी भगवंताकडे नेणाऱ्या आहेत आणि इतर देहबुद्धीला धरून असणाऱ्या उपाधी आपल्याला अंतर्यामी अखंड विराजमान असलेल्या आत्मस्वरूपापासून दूर नेणाऱ्या अहेत. तेव्हा त्याची गल्लत साधकाने करू नये. 

मान, मरातब, पैसा, सौंदर्य, मोठेपणा व यांसारख्या गोष्टींची उपाधी दूर दूर हटवल्या शिवाय नाम अंगी बिंबणे शक्य नाही. मग या उपाधी असताना नाम घेऊच नये का? तर नाही; उलट जास्त जोमाने, नेटाने आणि नियमाने नाम घेण्याची गरज आहे. त्या नामानेच उपाधी आपण किती घट्ट धरून ठेवल्या आहेत याची जाणीव हळू हळू निर्माण होऊ लागेल. त्या जाणीवेतून "माझ्या सद्गुरूंनी त्यांची सर्व अध्यात्म-शक्ती घालून दिलेले नामच मला तारेल" ही भावना दृढ होऊ लागेल. फक्त आपल्याला उपाधीकडून निरुपाधिक अवस्थेकडे जायचे आहे हे भान मात्र सतत ठेवले पाहिजे. जेणेकरून नामाचे इतके प्रेम निर्माण होईल की नामानुसंधानाशिवाय जगणेच अशक्य होइल. तेव्हा असे होवो आणि माझे नाम निरुपाधिक अवस्थेकडे जावो ही प्रार्थना सद्गुरुंजवळ करणे आणि शक्य तितके नामात राहणे आवश्यक आहे. 


महाराज म्हणत, इतके प्रेमाने नाम घ्या की परमात्मा आपल्या घरात नाचला पाहिजे! ते प्रेम तुम्हा-आम्हाला महाराजांच्या कृपेने प्राप्त होवो ही त्यांच्याच चरणी प्रार्थना! 

Wednesday, August 20, 2014

We should not adjust... We should accept with love! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आपल्या प्रपंचात घडणा-या लहान लहान गोष्टींना आपण जुळवून (adjust) घेतोच. पण फक्त जुळवून घेण्यापेक्षा आपण त्यांचा प्रेमाने स्वीकार का करीत नाही? स्वीकारायला (Acceptance) जे मन लागते ते तयार करणे ही फार मोठी गोष्ट आहे. 

भाऊसाहेब केतकर जेव्हा सत्याऐंशी-अठ्याऐंशी वर्षांचे झाले तेव्हा रात्री त्यांना लघवी लागायची आणि वय झाल्यामुळे आवरता न आल्यामुळे ती धोतरातच व्हायची. मी बाजूलाच निजलेला असे. ते मला हाक मारीत. मग त्यांचे धोतर बदलावे लागे. मी एकदा भाऊसाहेबांना म्हणालो, "भाऊसाहेब, हे काय होतंय?" तर ते मला म्हणाले, "अहो, बरोबर आहे. हा देह आता असेच करणार, या देहाचा दोष नाही. आता असेच व्हायचे." पण ते इतके शांत असायचे. त्यावर मी एकदा म्हटले, "तुम्ही इतके शांत कसे राहता?" यावर ते मला म्हणाले, "ही जर देणगी असेल तर महाराजांची आहे." हे Acceptance आपल्याजवळ आहे का? अरे, आपल्या घरातली माणसे आपल्याला स्वीकारता येत नाहीत. बाहेरून एक वेळ तुम्ही कसेही वागा, पण आतमध्ये 'असू दे; त्याने दिलेली आहेत ना, मग राहू दे' ही दृष्टी असेल तरच मन शांत राहील व हातून काही साधना होईल. 

महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

मी कसाही असलो तरी तुमचा आहे, तुम्ही मला अंतर देऊ नका. मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी. त्यांना एकसारखे बरोबर ठेवावे. त्यांची संगत वाटली पाहिजे आणि ते नामात आहेत म्हणून नामाची संगत पाहिजे. प्रत्येक गोष्ट - अगदी लहान सहान देखील - त्यांच्या कानावर घालून करायचा अभ्यास केला तर खात्रीने त्यांचे अस्तित्त्व जाणवू लागेल. 

श्रद्धा आणि निष्ठेची एक गोष्ट! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

गेल्या आठवड्यात एक गृहस्थ आले होते. नावाचे एवढे महत्त्व नाही. त्यांची बायको रविवारच्या निरुपणाला येते. तेही तीन-चार वेळा आले होते. परवा ते पेढे घेऊन आले होते. कशाचे पेढे म्हणून विचारल्यावर त्यांनी ही हकीकत सांगितली. अंधेरीला ते दोन लहान खोल्यांत राहत असत. भिक्षुकीचा व्यवसाय. त्यांच्या घरमालकाने त्यांनी जागा सोडावी म्हणून कोर्टात फिर्याद केली आणि त्याच्यासारखा निकाल होऊन बेलीफ आणून त्याने जागा खाली करून घेतली. यांनी आपले समान दोघा-तिघा मित्रांकडे ठेवले. बायकोला नाशकास पाठवले आणि आपण एका मित्राकडे राहू लागले. 

ते म्हणाले, "मला काहीच करणे शक्य नव्हते. प्रवचनात तुम्ही नामाच्या शक्तीबद्दल सांगितले होते, म्हणून मी अखंड नामस्मरण करू लागलो आणि श्रीमहाराजांना म्हटले, आता तुम्ही पहा. मित्रांनी वरच्या कोर्टात जायचा सल्ला दिला पण त्यासाठी माझ्याजवळ पुरेसे पैसे नव्हते. मित्रांनी मदत केली आणि वरच्या कोर्टात गेलो. तेथे कृष्णमूर्ती म्हणून न्यायाधीश होते. त्यांनी कोर्टात जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांच्या जागी मला श्रीमहाराजच दिसले. मला हा भ्रम होतो आहे काय असे वाटू लागताच ते न्यायाधीश दिसू लागले. त्यांनी तडकाफडकी निकाल देऊन जागा माझ्या ताब्यात परत देण्याचा हुकुम केला. मी पाहू लागलो तो परत तेथे श्रीमहाराज दिसू लागले." 

पहा बरे ही श्रद्धा! निष्ठा असेल तर काय होणार नाही? 


सतत नामस्मरणानेच 'निरपेक्ष' नाम येईल!

||श्रीराम समर्थ||


आमच्या गुरूंवर आमची निष्ठा नाही! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

आमच्या नातीला शाळेमध्ये बाईंनी सांगितलेले गणित चुकीचे असले तरी प्रमाण वाटते. दुस-या कोणी ते बरोबर करून दिले तरी ते पटत नाही. ते पाहून मला वाटले की आमच्या गुरूंवर आमची तेवढीदेखील निष्ठा नाही. श्रीमहाराजांनी सांगितले की 'तुम्ही नुसते नाम घ्या, बाकी सगळे मी करतो', त्यांनी हे आश्वासन दिलेले असूनही आम्ही 'पण' म्हणतो. हा पण म्हणजे संशय काढायलाच पाहिजे. उगीच इकडे जा तिकडे जा हे थांबवलेच पाहिजे. महाराज एकदा मला म्हणाले, 'मी जे सांगितले आहे त्यापेक्षा लोक जास्त तरी करतात किंवा कमी तरी करतात; मी सांगितलेले तेवढेच कुणी करत नाही' 

आपल्याला श्रीमहाराज मिळाले म्हणजे अमूल्य हिरा मिळाला आहे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

नामापासून काही अपेक्षा न ठेवता नाम घेणारा फारच थोर असला पाहिजे. कारण परमार्थ करतो म्हणणारे सुद्धा नामाखेरीज इतर भानगडीत गुंतलेले दिसतात. म्हणून सावधानता बाळगून मार्गात (On the track) राहावे. मी एकदा श्रीमहाराजांना म्हणालो की, आपण किती लोकांच्या अंतःकरणात प्रेम लावून गेलात! हे ऐकल्यावर श्रीमहाराजांना एकदम भरून आले आणि ते म्हणाले, "जो मनुष्य येतो, तो वेगळा असे मला वाटतच नाही". आपल्याला श्रीमहाराज मिळाले, म्हणजे अमूल्य हिरा मिळाला आहे. तो मी चोवीस तास जपतो आहे, असे वाटले पाहिजे. अखंड नाम घ्यावे. ते काही अशक्य नाही. ती एक कला आहे असे महाराज सांगत. 

कधी एकदा नामाला बसतो असे वाटले पाहिजे!

||श्रीराम समर्थ||


नाम घेत राहिलात तर तुम्ही माझ्यासारखे व्हाल!

||श्रीराम समर्थ||


भगवंताच्या नियमाचे पालन !

||श्रीराम समर्थ||


नाम किती घ्यावे?

||श्रीराम समर्थ||


श्रीमहाराजांचे रिझर्वेशन संपूर्ण जीवनाचे असते! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

एकदा श्री. चौबळ श्रीमहाराजांना भेटले. ते काही कामासाठी दिल्लीला जाणार होते, म्हणून तीन आठवडे आधी त्यांनी रिझर्वेशन करून ठेवले होते. श्रीमहाराजांना त्यांनी हे सांगितल्यावर श्रीमहाराज म्हणाले, हो का! तीन आठवडे आधी रिझर्वेशन मिळते? मला हे माहीत नव्हते. नंतर म्हणाले, माझं तोंड ज्यांच्या कानाला लागलं, त्यांचं मी असंच रिझर्वेशन करून ठेवलं आहे. तुमचं रिझर्वेशन दोन-तीन आठवड्याचं असतं, माझं मात्र संपूर्ण जीवनाचं असतं ! 


महाराजांची अपेक्षा!


||श्रीराम समर्थ||


सत्याची ही खाण रामनाम !

||श्रीराम समर्थ||


ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला!


||श्रीराम समर्थ||


महाराजांच्या वागण्यातली खुबी ~ परमपूज्य बाबा बेलसरे

महाराजांचे चरित्र किती अलौकिक होते म्हणून सांगू? ते अमुक एक गोष्ट का करीत ह्याचा पत्ता कित्येकांना लागत नसे. काय खुबी असे त्यांच्या वागण्यात! पाने वाढलेली असत. सगळी माणसे पानांवर बसलेली असत आणि महाराज इकडे तिकडे वेळ काढून सगळं अन्न गार झालं की जेवायला बसत. ब-याच वेळा लोकांना गरम अन्न खायला मिळायचं नाही. अशी लोकांची अन्नासंबंधीची आसक्ती त्यांनी कमी केली. 

वैखरीने नाम घेण्याला महत्त्व का? ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराजांना आपण नामावतार म्हणतो. 'अवतरण' म्हणजे वरून खाली येणे. परा वाणी हे नामाचे निजधाम आहे. भगवंत जसा निजाधामाहून खाली येतो- अवतार घेतो आणि अवताराचे कार्य झाले की निजधामाला परत जातो, तसे नाम परा वाणीतून वैखरी पर्यंत खाली येते आणि त्याचे कार्य (जीवाचा उद्धार) झाले, की पुन्हा परे पर्यंत परतते. म्हणून वैखरीने नाम घेण्याला महत्त्व आहे. "पुढे वैखरी राम आधी वदावा" असे समर्थांनी सांगितले आहे. श्रीमहाराजांनीही "दीनदास म्हणे सांगतो ते ऐका | अभ्यास वैखरी सोडू नका ||" असे म्हटले आहे. 


Sunday, August 17, 2014

श्रीमहाराज आपल्या घरी आले तर .... ~ परमपूज्य बाबा बेलसरे


श्रीमहाराजांच्या विशिष्ट गुणांचा अभ्यास केला आणि ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, तर आपला प्रपंच उत्तम होईल आणि पारमार्थिक उन्नती साधेल. साधी वृत्ती, लीनता, सहनशीलता, निरलसता, संतोष, आर्जव, जनप्रियत्व, कोणतीही गोष्ट मनापासून करणे, झाल्या-गेल्याचा विसर, पुढच्याचा विचार आणि व्यवहाराचा परमार्थासाठी उपयोग (म्हणजे परमार्थ हे ध्येय साधण्यासाठी व्यवहार साधन म्हणून करणे) हे श्रीमहाराजांचे दहा विशिष्ट गुण त्यांच्या चरित्रात दिलेले आहेत. त्यांचे चिंतन करून ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. जनप्रियत्व हा त्यांचा आवडता गुण होता. 

*** श्रीमहाराज आपल्या घरी आले, तर आपल्या वागण्यात बदल 
करावा लागणार नाही, असे आपले वागणे असावे ***

त्यांचे अस्तित्व आपल्या जाणीवेत आले, तर आपल्या हातून काही वावगे घडणारच नाही! 

भजन कसे करावे?


||श्रीराम समर्थ||


खरा आनंद कशात आहे?


||श्रीराम समर्थ||


Thursday, August 14, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ६ -

नाम -

६) नामात राहणारा पुरुष फार थोर असला पाहिजे.

~~ “जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी खूण” हे शेवटचे बोल असणारे आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे प्रत्यक्ष नामावातार होत. स्मरण ही कृती आहे आणि विस्मरण ही वृत्ती आहे असे महाराज सांगत. म्हणजे भगवंताचे स्मरण जोवर देहबुद्धी आहे तोवर एक समजून करावी लागणारी कृती आहे. आणि ह्या कृतीचा पाया जर असेल तर ते म्हणजे भगवंताचे नाम. किंबहुना नाम आणि भगवंत दोन नाहीतच असे ते सांगत. तेथे द्वैत नाही. तेव्हा स्मरण ही कृती सहजसाध्य होण्यास, म्हणजेच अनुसंधान टिकण्यास नाम ही कृती आहे; त्याचबरोबर विस्मरण टाळण्यास अथवा इतरही वृत्तींवर ताबा आणण्यास देखील नाम हीच गुरुकिल्ली आहे. असे नामाचे अखंड स्मरण ज्याला असते तो थोर असला पाहिजे ह्यात शंकाच नाही.
                              

ह्यात अजून एक मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे, नाम हेच साधन आहे आणि नाम हेच साध्य आहे. जेव्हा सद्गुरू आपल्याला नाम देतात, तेव्हा त्यातून अजून काही मिळवायचे नसून नामाचे प्रेम मिळवायचे आहे. नामाचे प्रेम आले की भगवंताचे प्रेम त्याला लागूनच येते. नामानुसंधान सांभाळणे म्हणजेच भगवंताचे स्मरण सांभाळणे. महाराज म्हणतात, तुमचे देहावर जितके प्रेम आहे, तितके ब्रह्मानंद बुवांचे नामावर होते. म्हणजे देहाला काही झाले तर कसा जीव कासावीस होतो, तसे नामानुसंधान भंगले म्हणजे त्यांचा जीव कासावीस होई. असा पुरुष महाराजांना परमप्रिय शिष्य झाला ह्यात नवल ते काय! तेव्हा हा आदर्श ठेवून आपण आपल्या अध्यात्मिक जीवनाला नामानुकूल वळण कसे दिले पाहिजे याचे चिंतन होणे आवश्यक आहे! 

Wednesday, August 13, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ५ -

नाम-

५) नामाचे साधन हे ‘फास्ट’ गाडीप्रमाणे आहे. रंग दिसणे, प्रकाश दिसणे, आवाज ऐकू येणे, ही मधली स्टेशने सोडून नाम एकदम भगवंताकडे नेऊन पोचवते.

~~ श्रीराम. जेव्हा सद्गुरू एखादे साधन सुचवतात, तेव्हा त्या साधनाचा उद्देश शिष्याला आत्मज्ञानापर्यंत पोहोचवण्याचा असतो ह्यात शंका नाही. ते साधन गुरुमुखातून आलेले असल्याने त्यात गुरूंची सर्व शक्ती सामावलेली असते. परंतु, शिष्याने ते साधन कोणताही विकल्प मनात न आणता प्रसन्न मनाने उच्च ध्येयाने प्रेरित होऊन अखंडितपणे करायचे असते. त्याला काल-मर्यादा घालू नये. जसे, पुष्कळ लोक नाम मिळाल्यानंतर ठराविक दिवसांत आपल्याला अखंड समाधान प्राप्त व्हावे आणि साधनातले जे अनुभवांचे मुक्काम असतात तेही प्राप्त व्हावेत अशी इच्छा धरतात. अर्थातच हे सर्वांना प्राप्त न झाल्याने त्यांच्या मनात साधनाविषयी विकल्प येण्यास सुरुवात होते आणि विकल्पाला खत-पाणी घातले की विषाचे रोप फोफावते आणि साधकदशा उध्वस्त होते. हे असे न व्हावे.

ब्रह्मानंद महाराजांविषयी श्रीमहाराज एके ठिकाणी म्हणतात, त्यांनी स्वतःपेक्षा जास्त प्रेम नामावर केले त्यामुळेच ते तरले! “नामापरते तत्व नाही रे अन्यथा” ही ज्ञानदेव उक्ती ते अक्षरशः जगले. अशांवर सद्गुरू कृपा होते हे खरेच. परंतु, नाम घेऊ लागल्यावर काहीतरी अनुभव यावेत अशी बऱ्याच लोकांची इच्छा असते. त्या विषयी महाराज सांगतात, नामस्मरण हे साधन सूक्ष्मातले आहे. स्थूलामध्ये त्याचे अनुभव पाहणे तितकेसे बरोबर नाही. आपले सूक्ष्म असे जे अंतःकरण त्यात काय बदल झाला आहे हे पाहणे जास्त महत्त्वाचे. नामाने जर ध्यानापर्यंत प्रगती झाली तर रंग दिसणे, सुगंध येणे किंवा ज्योत दिसणे असे अनुभव येऊही शकतील; परंतु त्यांचे तितकेसे महत्त्व नाही.


एकदा महाराजांकडे एक देशाच्या उत्तर भागातील साधू आले होते. त्यांनी महाराजांना विचारले, मला साधन सुरु केल्यावर काही वर्षांनी ज्योतीचे दर्शन होत असे; पण आता ते होत नाही. म्हणजे मी मागे आलो की काय? महाराजांनी विचारले, साधन चांगले चालू आहे ना? ते म्हणाले, हो उत्तम चालू आहे! त्यावर महाराज म्हणाले, ही स्थूलातली दर्शने ही मार्गावरील स्टेशने आहेत. तुम्ही ह्याच्या पुढे गेला आहात; मागे नाही! भगवंत जसा जसा समीप भासू लागतो, तसतशी ही अनुभवांच्या मागे धावण्याची उर्मीच कमी होते. राहतो तो फक्त आनंद, शांती आणि समाधान! या स्थितीपर्यंत साधकाने पोहचायचे आहे. ह्याला सद्गुरू कृपा आणि त्यांच्यावर निष्ठा ठेवून अखंड साधन हाच पर्याय आहे! नामात राहावे; अधिकाधिक नाम घ्यावेसे वाटावे, यापलीकडे परमार्थ नाही! 

ओढ लागली भेटीची !!!

ओढ लागली भेटीची |
बोलाविसी कधी सद्गुरुराया, ओढ लागली भेटीची ||

गोंदावले हे स्वप्नी दिसे 
चाहूल येता रोमांच उठे 
दिसे गाभारा पवित्र देखणा 
त्यात कोंदण सद्गुरुराणा
अशीर्वादासी उचले हात
घनगंभीर देई नाम साद
चरण दिसता सार्थक जाहले
नयन सहजचि ओलावले
आर्त मनीची निवाली पूर्ण
देखता श्री परमपरिपूर्ण
जाग येता मनी लोचनी
सद्गुरुवीण नाही रिता ठाव

                                                           ओढ लागली भेटीची |
                                                          बोलाविसी कधी सद्गुरुराया, ओढ लागली भेटीची ||

Tuesday, August 12, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ४ -

नाम --

४) भगवंताचे स्मरण करावे म्हणजे प्रपंच सोपा जातो.

~~ श्रीराम. हे बोधवचन म्हणजे प्रापंचिक लोकांसाठी आशेचा किरण आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण पाहतोच आहोत की जग कसे चालले आहे आणि प्रापंचिक मनुष्य निराशेच्या गर्तेत अडकत चाललेला आहे. श्री महाराज अनेक ठिकाणी सांगतात की पुढे काळ फार कठीण येणार आहे. अक्षरशः माणूस माणसाला खायला उठेल. त्या वेळी सामान्य प्रापंचिकाला जर कुणी तारेल तर ते फक्त भगवंताचे नाम तारेल, कारण नामातच भगवंताचे स्मरण साठवलेले आहे. भगवंताचे स्मरण हा सर्व भवरोगांवर रामबाण इलाज आहे. महाराज एके ठिकाणी सांगतात, परमार्थ हा आपला मुख्य धंदा हवा आणि प्रपंच हा जोडधंदा. आपले उलट झाले आहे! आपण परमार्थ करताना प्रपंचाचा विचार करतो. त्याउलट सत्पुरुष आपल्याला प्रपंच करताना परमार्थाचा – भगवंताचा विचार करण्यास प्रवृत्त करतात.


सर्व प्रापंचिक संतांचे आयुष्य आपण पाहिले तर आपल्याला असे दिसेल की प्रापंचिक दृष्ट्या त्यांचे आयुष्य अजिबात डोळ्यात भरण्या सारखे नव्हते. तुकोबा काय, एकनाथ महाराज काय किंवा आपले महाराज काय! प्रपंचातली दुःखे त्या सर्वांनी सहज पचवली; कारण त्यांच्या अंतरंगात भगवंताचे अखंड अनुसंधान होते. एवढेच नाही तर स्वतः अनुसंधानात राहून हजारो लोकांना त्यांनी प्रपंचात राहून परमार्थात स्थिर होण्याचा मार्ग दाखवला! कोट्यानुकोटी उद्धरिले लोक, रामनाम एक बोधुनिया! पण अनेक लोक म्हणतात, ते मोठे संत, हे आपल्याला कसे जमावे? असा निराशावादी दृष्टीकोन परमार्थात कधीच उपयोगी पडायचा नाही. संत हे आपले आदर्श आहेत. त्या आदर्शाप्रत आपल्याला पोहोचायचे आहे. आणि त्यासाठी उत्तम, अनुभव-समृद्ध आणि गुरुप्रचीतीने युक्त असा मार्ग आपल्याला मिळालेला आहे. त्या मार्गावर न थकता चालत राहणे आणि अखंड सद्गुरूंचे स्मरण ठेवून त्यांची आपल्याला या मार्गावर ठेवण्याची प्रार्थना करणे हीच जीवन सार्थक बनवण्याची खूण आहे! 

श्रीमहाराजांच्या घडविण्याला आपण सहकार्य केले पाहिजे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराज आपल्याला घडवीत आहेतच. आपणही आपल्याकडून त्यांना सहकार्य केले पाहिजे. श्रीमहाराज म्हणायचे, 'एखादा चांगला मुलगा असेल तर शाळेमध्ये त्याला एकदम वरच्या वर्गात घालतात. तसेच मी करतो. तुम्ही अभ्यास केलात तर डबल प्रमोशन देतो (परमार्थात).' त्यांचा कुठेतरी स्पर्श झाल्याशिवाय हे होणार नाही. महाराजांचे- नामाचे प्रेम यावे यासाठी नामस्मरण करीत वाट पाहत राहणे एवढेच आपण करू शकतो. ह्या वेटिंग पिरीयड मध्ये चिकाटीची फार आवश्यकता आहे. सुरुवातीला थोडे कंटाळवाणेपणा आहे. श्रीमहाराजांवर - नामावर प्रेम करणे हे दृश्यावर प्रेम करण्यासारखे सोपे नाही. ते देतील तेव्हाच प्रेम येईल. म्हणून ते प्रेम द्या अशी तळमळून प्रार्थना करावी. "प्रेम देवाचे देणे | देहभाव जाय जेणे ||" श्रीमहाराजांचे प्रेम यायला एक उपाय म्हणजे त्यांची आतली संगत घडली पाहिजे. आतमध्ये सारखे त्यांच्यासंबंधीचे विचारच घोळत राहिले पाहिजेत. 

प्रपंच उणे आसक्ती = परमार्थ! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

प्रपंच उणे आसक्ती बरोबर परमार्थ असे समीकरण मांडता येईल. म्हणजे, असक्तीविना केलेला प्रपंच हा परमार्थच होय. हे करताना आपल्या काही मुख्य चुका होतात- आपण प्रपंचात गुंततो आणि देण्या-घेण्यात फार गुंतून राहतो. प्रपंचातही नवरा, बायको, मुले बाळे, इतर नातेवाईक हे आपले समकालीन असतात. आपण त्यांना काही मागितलेलं नसतं. प्रारब्धाने म्हणा किंवा भगवंताने म्हणा ते आपल्याला दिलेले असतात. त्यांचे आणि आपले संबंध हे accidents असतात; ते तात्पुरते असतात. फक्त श्रीमहाराजांचा संबंध हा चिरंतन संबंध आहे. श्रीमहाराजांनी विश्वनाथ म्हणून एकांना पत्रात लिहिले होते की, तुम्हाला आई नाही, बाप नाही, बंधू नाही, पण मी आहे! म्हणून शरण जाऊन श्रीमहाराजांना सांगावं, की आता मला तुमच्याशिवाय कोणी नाही. प्रपंचातले प्रेम, आसक्ती काढायला मला मदत करा असं त्यांचं आवाहन करावं. बाह्यात्कारी प्रपंचात प्रेम करावं; पण आत गुंतलेलं नसावं. श्रीमहाराजांखेरीज (सद्गुरुंखेरीज) माझे कोणी नाही अशी आत खात्री असावी. 

गरीब कोण व श्रीमंत कोण?


||श्रीराम समर्थ||


तुम्ही फक्त नाम घ्या!


||श्रीराम समर्थ||


नाम चालू असता जे घडेल त्याची जबाबदारी महाराजांची! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

नाम चालू असतांना ज्या गोष्टी घडतात त्या श्रीमहाराजांच्या साक्षीने घडतात; नाम चालू असताना ज्या गोष्टी घडतात त्यांची जबाबदारी माझी असे त्यांनीच सांगितले आहे. म्हणून सतत नाम घेतले तर संपूर्ण जबाबदारी त्यांची होईल. स्वाभाविकच त्यासाठी नामाकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. नेहमीची कर्मे करताना नाम टिकले तर नाम चांगले चालण्यासाठी वेगळे कष्ट नकोत. उदाहरणार्थ, स्नान, जेवण इत्यादी करताना नाम टिकले पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला प्रयत्नपूर्वक नाम घ्यावे लागेल. अप्रिय घटनांत आणि सुखाच्या परिस्थितीत नामस्मरण करायचा अभ्यास केला पाहिजे. आज आपली श्रद्धा- खरे म्हणजे विश्वास दृश्यामध्ये आहे, ती अदृश्यात किंवा सूक्ष्मात गेली म्हणजे मग कोणताही प्रसंग आला तरी समाधान राहील. "त्यांची इच्छा" अशी प्रतिक्रिया आली पाहिजे- नव्हे तो स्वभाव झाला पाहिजे! 

सद्गुरू सेवा हा पतिव्रता धर्मच आहे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

मला खरं काय पाहिजे याची मला कल्पनाच नाही. श्रीमहाराजांकडे सुंदर जीवनाचं प्रत्यंतर मागावं. मुख्य म्हणजे त्यांची सतत आठवण पाहिजे. ज्यात त्यांचं विस्मरण होईल ती परिस्थिती नको. त्यांची आठवण हेच आश्वासन. यासाठी अभ्यासच पाहिजे. श्रीमहाराजांना सोडून मन दुस-या आधाराकडे जात नाही ना ते पहावं. हा पतिव्रता धर्मच आहे. महाराज भोग भोगायला लावून समाधान देतात, शक्ती देतात. नाम हे त्यांचं स्वरूप आहे. नाम इतकं घ्यावं की दुसरं कशाचं स्मरण होता कामा नये! 

Monday, August 11, 2014

परमार्थ कोणता?


||श्रीराम समर्थ||


साधकाने आत-बाहेर गोड असावे!


||श्रीराम समर्थ||


नाम इतके घ्यावे की शरीरातल्या पेशी सुद्धा नाम घेतील!


||श्रीराम समर्थ||


श्रीमहाराजांचे बोधवचन ३ -

नाम --

३) आपण नामस्मरण ‘करतो’, पण ते कसे? एका माणसाने रखेलीचे प्रेम आपल्यावर राहावे म्हणून गुरुचरित्राचा सप्ताह केला, दुसऱ्या एकाने पुष्य नक्षत्रावर सोने विकत घेऊन आपल्या ठेवलेल्या बाईला दिले; तसे, आपण नाम घेतो, पण त्याचा उपयोग विकारांचे दास्यत्व वाढविण्यासाठी आपण करतो! 

~~ श्रीराम. संत सत्पुरुष समाजाला दोन तऱ्हेने मार्गदर्शन करतात. एक रीत समजावून सांगून पटवून देण्याची असते आणि दुसरी रीत स्पष्ट शब्दात कानउघाडणी करण्याची असते. तशी थोडीशी कान उघाडणी महाराजांनी या वचनात केलेली आढळते. या प्रकारची ‘स्पष्ट शब्दात काय करू नये’ हे सांगणारी महाराजांची वचने तशी कमी आहेत; त्यामुळेच या वचनाचे महत्त्व जास्त! पुष्कळ लोक महाराजांना आम्ही नाम घेऊन देखील आम्हाला अजून शांती-समाधानाचा अनुभव कसा येत नाही असे विचारत. तेव्हाच महाराजांनी अशा शब्दात त्यांना पटवून दिले असावे.


नामस्मरणाचा हेतू हा अतिशय शुद्ध, पवित्र असावा आणि असा शुद्ध हेतू म्हणजे अधिकाधिक नाम घेण्याची इच्छा हा होय! मना वासना वासुदेवी वसू दे! ज्या काही इच्छा, आकांक्षा, वासना असतील त्या सर्वच्या सर्व भगवंताच्या / सद्गुरूच्या चरणी वाहिल्याशिवाय साधनेला धार येणार नाही असे पूज्य बाबा देखील अनेक ठिकाणी आवर्जून सांगतात. पुढे एका वचनात महाराज हेतूला अतिशय महत्त्व आहे हे सांगतात. कोणतेही कर्म असो, जोवर आपण कर्मबंधनात अडकलेलो आहोत, तोवर प्रयत्न हा हवाच! हा प्रयत्न सत्कारणी लागणे म्हणजेच विकारांच्या दास्यातून मुक्तता होणे हा आहे. महाराज म्हणत, विकार असू देत. पण तुम्ही त्यांच्यावर हुकुमत गाजवावी, त्यांनी तुमच्यावर नव्हे! हे घडण्यासाठी अर्थात नामस्मरण हाच राजमार्ग आहे. नामसाधनेने हळू हळू वासना विरहित अवस्थेकडे आपली वाटचाल होईल हे नक्की; परंतु, हा हेतू निदान मनामध्ये अविचल असावा. तर त्याचे पर्यवसान वृत्ती सांभाळून नाम घेण्यात होईल! 

Sunday, August 10, 2014

काळजी करणे सोडले पाहिजे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

महाराजांना आपल्या जवळ राहायला कष्ट होऊ नयेत म्हणून तरी काळजी करणे सोडले पाहिजे. काळजी करायची तर साधनाची काळजी करावी, म्हणजे काळजीचे उदात्तीकरण- sublimation होते. तुकाराम महाराजांनी ते केले. ते म्हणतात- "संतांचा पढियावो कैशापरी लाहो |नामाचा आठवो कैसा राहे |||| हेचि थोर चिंता लागली मानसी | निजता निद्रेसी नलगे डोळा ||||" 

या रीतीने साधन होण्यासाठी विकारांच्या आधीन होता कामा नये. असं ठरवावं सुरुवातीला की आता आठ दिवस तरी विकारांच्या आधीन होणार नाही. हा उत्साह टिकण्यासाठी "चांगला मी" सशक्त केला पाहिजे. सद्गुरूंना आवडते ते केले की मनच गुरु होईल. नाम हा त्यांचा प्राण आहे. तो जपण्यासाठी नाम घेताना सावधानता ठेवली पाहिजे. पुन्हा विकारांच्या आधीन होऊ नये. त्यासाठी थोडी पश्चात्तापाची पार्श्वभूमी हवी. असं वाटलं पाहिजे की त्यांनी माझं इतकं केलं, मग मी थोडं तरी त्यांचं ऋण फेडायला नको का? हे साधण्यासाठी जमत असल्यास साधनात विरोध येईल अशा विचारांच्या लोकात शक्यतो मिसळू नये. 

परमार्थी मनुष्य मनाने विशाल असावा! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

श्रीमहाराज एकदा म्हणाले, "मी येथे गोंदवल्याला दुकान घालून बसलो आहे. या दुकानात विशालता विकायला ठेवली आहे." किती खरे आहे! परमार्थी माणूस क्षुद्र असता कामा नये. मनाने आणि कृतीने तो मोठा उदार, विशाल झाला पाहिजे. तरच त्याला स्वतःमधला आणि दुस-यांमधला परमेश्वर जाणवेल. स्वार्थ म्हणजे संकुचितपणा. याउलट परमार्थी माणूस विशाल म्हणजे निस्वार्थी झाला पाहिजे. समाजात खरे निस्वार्थी संतच असतात. त्यांचा सहवास करावा. 

Saturday, August 9, 2014

परमार्थ करणाऱ्यास घर सोडण्याची गरज नाही! ~ परमपूज्य बाबा बेलसरे

खरे म्हणजे परमार्थ करणा-याला घर सोडून कुठे जायची जरूरच नाही. श्रीमहाराज म्हणत, Self contained block असतो त्यामध्ये सर्व काही त्या block मध्ये असते. त्यामुळे तिथे राहणा-याला बाहेर जाण्याची जरूर नसते. त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्येच परमार्थाची सगळी व्यवस्था आहे. आपण कुठेही गेलो तरी ती व्यवस्था आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो! 

नामाने राग जिंकता येईल!


||श्रीराम समर्थ||


खरा गुरुपुत्र कोण?


||श्रीराम समर्थ||


नामालाच शरण जावे! ~ परमपूज्य बाबा बेलसरे


अखंड नामस्मरण केले तर ते नामच पुढचा मार्ग दाखवते. म्हणून नामालाच शरण जावे. त्याची प्रार्थना करावी. नामाने शक्तीसंचय होतो. ही शक्ती शहाणी आहे. काहीतरी कार्य केल्याशिवाय ती राहात नाही. म्हणून साधनविरोधी कार्याकडे ती वळत नाही ना इकडे आपण सावध राहून लक्ष दिले पाहिजे. नामाच्या पावित्र्याबद्दल सांगताना एकदा श्रीमहाराज म्हणाले, नाम घेता आणि तीर्थयात्रेला जावं असं तुम्हाला वाटतं! भावार्थ असा की नामाने सर्व पापे नाहीशी होतात यावर तुमची श्रद्धा नाही आणि म्हणून तीर्थयात्रा कराव्या असे तुम्हाला वाटते. 

धृवाची नामानिष्ठा खरी!


||श्रीराम समर्थ||


परमार्थाच्या आड काहीच येत नाही!

||श्रीराम समर्थ||


कंठी नाम राहण्यासाठी आपण काय करावे? ~ परमपूज्य बाबा बेलसरे

माणूस हा वासनांचा पुंज- a bundle of desires आहे. वासना सहज नाहीशा होत नाहीत. नामाने त्यावर ताबा येतो. नवसच करायचा तर कंठात नाम राहील हा नवस पुरवावा अशी प्रार्थना करावी. नाम हे जड आणि सूक्ष्म यांना जोडणारी साखळी आहे. ते सूक्ष्म होण्याआधी कंठी राहिले पाहिजे. कंठी नाम राहण्यासाठी आपण काय करावे? 

एक लक्षात घ्या- जडामध्ये तृप्ती असते. उदाहरणार्थ, तहान लागली आणि पाणी मिळालं की तृप्ती होते. तसे कंठात नाम राहिले की जडाच्या पातळीवरही तृप्ती येईल. मग वृत्ती उठताच त्याच्या तोंडी नाम देणे हळू हळू जमू लागेल. हा एक अभ्यास आहे. दुसरा माणूस आपल्याशी बोलतो, तेव्हा ते ऐकताना कंठात नाम राहायला काय हरकत आहे? ही अखंड नामस्मरणामधील एक पायरी आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर चांगलं गाणं ऐकलं, आवडलं की नंतरही त्याचे सूर मनात राहतात, तसं नाम राहिलं पाहिजे. अगदी लिहित असतानादेखील आत नाम चालू राहतं हा माझा अनुभव आहे. स्नान करताना, जेवताना नाम टिकवायचा अभ्यास किती जण करतात? सगळे व्यवहार करताना जर काळजी राहते तर नाम राहायला काय हरकत आहे? 

जन्मोजन्मीची साथ फक्त सद्गुरूंची!


||श्रीराम समर्थ||


चिंता करायची तर फक्त अनुसंधानाची करा!


||श्रीराम समर्थ||