It is a blog dedicated to Late Poojya Shri Baba Belsare (Prof. K.V.Belsare), a devout disciple of Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj. The blog will include his teachings (that he proudly states as nothing but the gems of wisdom from Shri Maharaj) and the importance of Raamnaam, which is the "Nectar" of divine existence. It's very simple- Chant Naama and be at Peace! ||श्रीराम जय राम जय जय राम||
Saturday, December 5, 2015
Sunday, October 4, 2015
ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-
ज्ञानेश्वरी अध्याय २- ओवी क्रमांक ५९-
तू गुरु बंधू पिता | तू आमुची इष्ट देवता |
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||
तूचि सदा रक्षिता | आपदी आमुतें || ५९ ||
~ श्रीराम. (अर्जुन आपला सखा कृष्ण याला माझे हित काय आहे ते आता तूच सांग अशी विनवणी करतो, तेव्हा त्या सख्यत्वाच्या आधारावरची पुढील ओवी आणि त्यावरील पूज्य बाबांच्या विवरणाचा सारांश).
या ओवीतलं एकेक पद बघा. पहिल्यांदा अर्जुन कृष्णाला गुरु म्हणतो. गुरु म्हणजे तो ज्ञानी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणजे जे शिकावयाचे ते तुझ्यापासूनच शिकावयाचे! हा देवाशी अथवा सत्पुरुषाशी संबंध आहे. नंतर बंधू- बंधू याचा अर्थ असा आहे की, मी खाली जात असताना मला वर नेणारा. दुसरा अर्थ श्रीमहाराजांनी सांगितला की, गुरुबंधू म्हणजे गुरूला काय आवडते ते सांगणारा! नेहमी असे असते की, जे ज्येष्ठ श्रेष्ठ असतात ते आपल्या गुरुचं अंतःकरण लवकर ओळखतात. आणि त्यांना काय आवडते ते सांगू शकतात. ते आपल्याला गुरूंशी कसं वागावं हे शिकवतात. जे ज्ञान देतात ते गुरुबंधू. पिता चा अर्थ आहे- रक्षणकर्ता!
यामध्ये ‘तू आमुची इष्ट देवता’ हे फार महत्त्वाचे आहे. एकच देव! आपल्याला ते चमत्कारिक वाटते, पण भक्तीमध्ये प्रेमाची अतिशय एकाग्रता होण्याला हे आवश्यक आहे. तुलसीदासांची एक गोष्ट आहे. हे रामभक्त. त्यांना कुणी सांगितले की श्रीकृष्ण हा पूर्णावतार आणि त्याला १६ कला होत्या. राम हा मर्यादापुरुषोत्तम आणि त्याला ९ कला होत्या. तर त्या गृहस्थाचे म्हणणे असे की १६ कला असलेल्या श्रीकृष्णाची तुलसीदासांनी भक्ती करावी. तुलसीदास त्यावर म्हणाले, “मला रामामध्ये ९ कला आहेत हे माहीत देखील नव्हते. तेव्हा आता तू सांगितलेस तर माझी रामभक्ती ९ पट वाढेल! भक्ताच्या जीवनात अशी एक अवस्था येते, की त्याला दुसरा देव नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)
Saturday, October 3, 2015
ज्ञानेश्वरी विचारधारा ४-
नाम घेत आहोत म्हणजेच योग्य मार्गावर आहोत!
श्रीराम.
~~ एक माणूस गिरणीच्या यंत्रशाळेत गेला. तिथे त्याचे उपरणे एका चाकात अडकले, तर हा हा म्हणता तो सर्वच त्यात ओढला गेला. तसे माणूस भगवंताचे नाम घेऊ लागल्यावर तो पोहोचतोच यात शंका नाही. त्याची जी खेच आहे, त्याला अभिक्रम म्हणतात.
~~ भगवंताचे घेतलेले नाम कधीही वाया जात नाही.
~~ आपली आतली घाण जेवढी असते ती नाहीशी करण्यास लागणारा प्रयत्न आपला होत नाही, म्हणून आपली प्रगती दिसत नाही.
~~ महाराज एकदा म्हणाले, "गाईने शेण टाकले की ते थोडीतरी माती घेतल्याशिवाय उठणार नाही. तसे तुम्ही थोडी जरी भक्ती केलीत तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. तो परिणाम सूक्ष्मातला असल्याने कळणार नाही.
~~ प्रगती होत आहे की नाही हे लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला आपल्या मनानेच सांगितले पाहिजे की मी योग्य मार्गावर आहे.
~~ कबीराचे वाक्य नेहमी लक्षात ठेवावे- "कहत कबीरा सुन मेरे गुणिया | साहेब मिले सबुरी में ||" याला अरविंदांचे वाक्य फार सुंदर आहे, "You must have intense aspiration but with great patience." या पेशन्स चा अर्थ असा की मला मनाची शांतता पाहिजे यात शंका नाही पण ती तुझ्या इच्छेप्रमाणे, तुला हवे तेव्हा मला दे. नाम घेतले की थोडक्या काळात साधू होईल असे कठीण आहे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड २ रा)
ज्ञानेश्वरी विचारधारा ३-
नामस्मरणाच्या अभ्यासाला तळमळ आवश्यक;
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!
तत्त्वज्ञानाचा उपयोग साधनेसाठी!
परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेतील काही भागाचा सारांश -
ती. बाबा एकदा अगदी सहज बोलताना म्हणाले, "अरे, सामान्य माणूस आपली डिग्री मिळवण्यासाठीसुद्धा पद्धतशीर प्रयत्न करीत नाही; अभ्यासाची पद्धत किती जणांना माहीत असते? नामस्मरण हा एक जन्मभर चालणारा अभ्यास आहे याची जाणीव किती लोकांना असते? मग अर्धवटपणे केलेल्या नामस्मरणाने काय साध्य होईल?" अशा त्यांच्या काही सूचना वाचकांना कदाचित आवडणार नाहीत, कारण सत्य हे कटू असते आणि ते श्रोत्यांना ऐकायला आवडत नाही. पण, जे अप्रिय आहे, परंतु पथ्यकारक आहे, ते सांगणारा व ऐकणारा भेटणे दुर्लभ असते!
ज्ञानेश्वरीच्या दुसरा अध्याय आणि त्यावरचे ती. बाबांचे विवेचन याचा अभ्यास झाल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की ती. बाबांना या सर्व विवेचनातून वाचकांना असे सांगावयाचे आहे की, या तत्त्वज्ञानाचा उपयोग केवळ आपल्या बुद्धीचे समाधान होण्यासाठी नसून त्याचा उपयोग आपले साधन अधिक दृढ व्हावे यासाठी केला पाहिजे. आपले साधन अधिक सातत्याने, चिकाटीने व नीट समजून केले तर ते अधिक फलदायी होईल. ती बाबा म्हणत, साधन हा एक अभ्यास आहे आणि तो जन्मभर चालणारा आहे.
माणूस पदवी मिळवण्यासाठी, नंतर व्यवसायात यश, पैसा ऐश्वर्य मिळावे म्हणून, समाजात मानमान्यता मिळावी म्हणून अभ्यास करतोच. याला Management of Objective असे म्हणतात. परमार्थाची साधना ही अशी नाही. ती कर्मयोगासारखी जास्त आहे.
***"हा अभ्यास सतत त्याच तीव्रतेने चालणे हेच त्याचे फळ आहे"***
महाराज म्हणत असत की, नामाने काय साधावे तर नामच साधावे!
ज्ञानेश्वरी विचारधारा २-
श्रीराम. आज तीन गोष्टी सांगतो तुम्हाला. या अगदी अनुभवाच्या आहेत. या गोष्टी झाल्या तर आपले भाग्य उदयाला आले असे समजावे!
१) हे अध्यात्म शास्त्र असे आहे, की ते एखाद्या व्यक्तीच्या तर्फेच रात्रंदिवस कानी पडावे; तरच हे साधते.
२) दुसरी गोष्ट अशी की स्वाभाविकच अनासक्त वृत्ती असावी. पैशाचे प्रेम फार नसावे, देहाचे प्रेम फार नसावे ही पुण्यायीचीच गोष्ट आहे.
३) आणि तिसरी गोष्ट ही की भगवंताचे स्मरण मला असावे ही स्वाभाविक तळमळ असावी.
या तीन पुण्यायीच्या गोष्टी आहेत. त्या जर अंगी आल्या तर पुण्य उदयाला आले असे समजावे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)
या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले!
(परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या एका प्रवचनाचा सारांश)-
श्रीराम. कॉलेज ला होतो तेव्हा दासबोध वाचताना समर्थांची "या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले" ही ओवी वाचली. तेव्हा फारसं कळत नव्हतं. वाटलं, समर्थ अतिशयोक्ती करताहेत. जर संसारात सुख नसतं तर इतके लोक संसारात पडले असते कशाला? पण आता जेव्हा गोंदवल्यास येतो आणि लोकांना भेटतो, तेव्हा कळतं, अरेरे! किती दुःख आहे जगामध्ये! केवळ प्रपंचामध्ये राहून 'पूर्ण सुखी' असा माणूस तुम्ही पाहिलाय का? शक्यच नाही!
अहो या विश्वात कितीतरी ध्येयं आहेत. दृश्यामध्ये ध्येयांची कमी नाही. अगदी स्वातंत्र्य मिळावं हे सुद्धा ध्येयच होतं ना? ध्येय मनुष्य कशासाठी ठरवतो; की त्या ध्येयाप्रत एकदा पोचल्यानंतर सुख समाधान मिळावं म्हणूनच ना? पण ते शक्य होतं का? आपण बघतोच आहोत. पण मग साधुसंत तर छातीला हात लावून सांगतात की आमच्याकडे साधन आहे सुख समाधान मिळवण्याचं? हे कसं?
तर जोवर आपण सुख समाधान दृश्यामध्ये शोधतो, तोवर ते मिळणं अशक्य आहे. जर मिळालं असं वाटत असेल, तर ते क्षणिक आहे. तेव्हा साधुसज्जनांनी सांगितलं, तुझं जे काही कर्म आहे, तेच तू कर. पण माझ्यासाठी किंवा माझ्या लोकांसाठी केलं म्हणू नकोस; ईश्वरासाठी केलं म्हण. जोवर कर्मात ईश्वर घातला नाही, तोवर कर्म पूर्ण होणारच नाही आणि जिथे पूर्णता नाही, तिथे समाधान असणं शक्य नाही!
तेव्हा समर्थांच्या ओवीचा अर्थ असा की जोवर मनुष्य ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाला लागला नाही, तोवर समाधान नाही नाही नाही!
ज्ञानेश्वरी विचारधारा १
श्रीराम. कोणताही ग्रंथ अतिशय पवित्रपणे वाचावा असे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात. पवित्रपणे म्हणजे बाहेरून देहानेच नव्हे, तर मनसुद्धा प्रपंचात नसावे. आणि हा नियम भगवंताच्या नामाला लागू करावा. आता मी नामाला बसतो म्हणजे प्रपंचाचा मी नाही, मनाने मी नाही, देहाने प्रपंचात राहावे लागेल, पण मनाने मी प्रपंचाचा नाही. असे म्हणून जर आपण नामाला बसलो, तर त्याची लज्जत काही निराळीच येईल.
याला दोन उपाय आहेत. एक आपण नेहमी आपल्या गुरूंचे चिंतन करावे, त्यांचे स्मरण करावे. त्यांचे स्मरण करावे म्हणजे काय तर त्यांचे व्यक्तिमत्व कसे होते ते स्मरण करावे. हे जर फार सूक्ष्म वाटले तर त्यांच्या चरित्रातला आपल्याला आवडणारा भाग घ्यावा आणि त्याचे चिंतन करीत आपण भगवंताच्या नामाला बसावे. यांपैकी एक कोणतेही धरून नामाला बसावे. जे आपल्याला आवडते ते धरावे.
मी कशाकरता जगतो आहे तर भगवंताकरता ही भावना ठेवून आपण नाम घेतले, तर मनाची अवस्था तीच होईल!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)
ज्ञानेश्वरी अध्याय १ ला- ओवी क्र. ५६-
श्रीराम. या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा किंवा कोणत्याही अध्यात्मग्रंथाचा अभ्यास कसा करावा हे सांगितले आहे; त्यामुळे सर्वांनाच ही ओवी अतिशय उपयुक्त आहे आणि परमपूज्य बाबांच्या विवेचनाने त्यास वसंत-बहर आला आहे हे निश्चित!
जैसे शारदीचिये चंद्रकळे | माजि अमृतकण कोंवळे |
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||
ते वेचिती मने मवाळे | चकोरतलगे ||५६||
~ शरद ऋतू म्हणजे थंडीचा काळ. त्यामध्ये पौर्णिमा आली की आकाश स्वच्छ असते. त्यात मनाला शांत करणारे चांदणे असते. कल्पना अशी आहे, की त्या प्रकाशामध्ये अमृताचे कण असतात आणि हे कोवळे अमृतकण चकोराचे जे पिल्लू असते, ते सेवन करते. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे भाषाप्रभूच! त्यांनी म्हटले आहे, 'चकोरतलगे', तलग म्हणजे लहान पिल्लू. चकोर पक्षी आहे, तो आकाशात विहार करतो. त्या पिल्लाला मात्र उडता येत नाही, म्हणून ते जमिनीवर चालणार. तलग म्हणजे तलावर चालणारे. अतिशय नाजूक असते ते. आईने भक्ष्य आणल्यावर ते चोच उघडते, त्यात दात नसतात तर भक्ष्य ते फक्त गिळते. तसे या ग्रंथाचे सेवन करावे.
*** याचा खरा अर्थ असा की, मला भगवंताचे प्रेम नाही, मला भक्तीच्या आकाशात संचार करता येत नाही, असा मी अज्ञ आहे. त्या अज्ञानाची जाणीव ठेवून हा ग्रंथ वाचा.***
या ग्रंथामध्ये शरदाचे चांदणे आहे आणि त्यात कोवळे अमृतकण आहेत. ते जे नाजूक नाजूक सांगितलेले आहे, ते भगवंताचे प्रेम आहे! ते मला कळत नाही असे म्हणून लहान होऊन त्याचे सेवन करा. माणसामध्ये ही शक्ती आहे की तो वयाने मोठा असला तरी, लहान मूल बनू शकतो.
***सगळे संत भगवंतापुढे मूल झाले म्हणून पोहोचले हे लक्षात ठेवा!***
उपनिषदांनी तर सांगितलेच आहे, "पाण्डित्यं निर्वेद्य, बाल्येन तिष्ठासेत्", वेद्य म्हणजे जाणणे. मला कळत नाही असे खरे वाटून जर मनुष्य बाल वृत्तीचा झाला, तर तो संतांना प्रियच होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितले आहे की, त्या चकोराच्या पिल्लासारखे जे असतील, त्यांना ज्ञानकण मिळतील!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)
ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९-
श्रीराम. ज्ञानेश्वरी अध्याय १ ला - ओवी क्र. ४९- (परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या ग्रंथातील सारांश) - पावित्र्याची खूण ~~
जे अद्वितीय उत्तम | पवित्रैक निरुपम |
परम मंगलधाम | अवधारिजो ||४९||
परम मंगलधाम | अवधारिजो ||४९||
~ महाभारत हा ग्रंथ कसा आहे ते ज्ञानेश्वर महाराज सांगत आहेत. अत्यंत पवित्र आणि अद्वितीय असा हा ग्रंथ आहे. मंगलाचे धाम आहे. याचा विस्तार केवढा प्रचंड आहे! ज्ञानेश्वर महाराजांनी नऊ हजाराच्या वर ओव्या लिहिल्या आहेत. पण पहिल्या 'ओम नमोजी' मध्ये स्फूर्तीची जी तीव्रता आहे, प्रकाश आहे, तो शेवटपर्यंत तसाच आहे. काय त्यांची प्रतिभा असेल! म्हणून "अद्वितीय, उत्तम आणि पवित्रैक निरुपम!"
पावित्र्याची खूण काय आहे, तर आपले मन मानवी दोषांतून क्षणभर तरी मुक्त होणे, हे पावित्र्याचे लक्षण आहे. जी व्यक्ती पाहिल्यावर आपल्या मनातील वासना कमी होते, मन स्वच्छ होते, ती व्यक्ती दिव्य आहे असे समजावे. त्यांच्याभोवती ते वातावरणच असते. ही प्रसन्नता साधी वृत्तीची प्रसन्नता नव्हे, तर आपले मन देहबुद्धीतून बाहेर पडते त्याची प्रसन्नता असते. अशी काही स्थाने असतात, की तेथे गेल्यावर तुम्ही स्वतःला विसरता. ही स्थाने सत्पुरुषांची असतात. तो सत्पुरुष शक्तीचा झरा असतो. सत्पुरुषांच्या पाया का पडावे, तर त्यांच्या अंगी परमात्मशक्ती प्रकट झालेली असते. त्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला पवित्र बनवतो!
ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२-
ज्ञानेश्वरी ओवी क्रमांक. २२- (अध्याय १ ला)
श्रीराम.
"मज हृदयी सद्गुरू | जेणे तारिलो हा संसारपूरु |
म्हणौनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ||"
म्हणौनि विशेष अत्यादरु | विवेकावरी ||"
~~ या ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी एक मर्माची गोष्ट सांगितली आहे. गुरूचे अस्तित्व कशात आहे? आपण लक्षात ठेवा की गुरूने जी आज्ञा केली आहे, त्या वचनामध्ये तो आहे! आपण शब्दांवर किती विश्वास ठेवतो! जग हे शब्दांवर चालते आहे. म्हणून गुरूच्या शब्दाचे सामर्थ्य फार आहे. माझ्या हृदयामध्ये सद्गुरू अधिष्ठान आहे, यात फार जबरदस्त अर्थ आहे. माझ्या हृदयामध्ये मी नाही तर सद्गुरू आहे माझा. तो कशा रूपाने आहे? तर विवेकाच्या रूपाने आहे.
या गुरूचे कार्य काय? तर हा संसारपूरु तारिला. जगामध्ये सत्य जे आहे ते माझे गुरु. आपल्याला खरे काय आहे ते अर्थरूपाने कळवून दिले असा तो गुरु आहे. या सबंध विश्वाला जो अर्थ आहे, त्याला अरविंदांनी Divine Will असे म्हटले आहे. तो अर्थ समजणे हे विवेकाचे काम आहे. या जगात व्यवस्था आहे. या जगतामध्ये आपण आलो हे काही कार्य करण्यासाठी आलो आहोत. ते कार्य मला ईश्वराने नेमून दिलेले आहे. ते कार्य झाले की मी चाललो. तोपर्यंत माझ्या जीवाला धोका नाही. ही गोष्ट शिकण्यासाठी हा सारा खटाटोप आहे. ती Divine Will किंवा ईश्वराचा संकेत कळणे हे खरे परमार्थाचे मर्म आहे.
अशा रीतीने सबंध ज्ञानेश्वरीमध्ये आत्मानात्मविवेकच सांगितला आहे. हे ज्याने "केले", त्याला ज्ञानेश्वरी कळली!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड १ ला)
गुरुसेवा म्हणजे काय?
श्रीराम. सर्व संत सांगतात, गुरुसेवा महत्त्वाची! पण गुरुसेवा म्हणजे काय?
महाराज म्हणाले, याचे उत्तर खूप सोपे आहे. गुरूला आवडेल ते केले म्हणजे गुरुसेवा झाली. आता प्रश्न आला, गुरूला काय आवडतं? एका भगवंताशिवाय गुरूला काहीच आवडत नाही. ते आपल्याला आवडलं की गुरुसेवा झाली!
महाराज पुढे म्हणाले, "आयुष्यातला थोडा काळ तरी असा घालवला पाहिजे की भगवंताकरिताच आम्ही जगतोय." कुणी नामाच्या वेळेला आला, तर त्याला सांगता आलं पाहिजे, की आत्ता माझ्या साधनेची वेळ आहे. यात लाज वाटता कामा नये. उगीच वेडेवाकडेपणा करू नये; पण खरंच असं वाटलं पाहिजे. त्याशिवाय साधन कसं होणार सांगा? सगळ्या अडचणीच आपण सांगत राहातो. असं करून चालणार नाही. गुरुसेवा अशी घडली पाहिजे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून
पूज्य बाबा बेलसरेंच्या आठवणीतील मुकुटमणी! सत्शिष्य काय असतो...
श्रीराम. आजपर्यंत आपण परमपूज्य बाबा बेलसरेंच्या ज्या ज्या आठवणी पाहिल्या त्या सगळ्या आठवणींचा मुकुटमणी ठरेल अशी ही आजची आठवण आहे पू बापूसाहेब मराठेंनी सांगितलेली! सत्शिष्य काय असतो आणि पू बाबा यांच्यावर महाराजांचे निरतिशय प्रेम का होते याचा दाखला:
“महाराज, दृश्य खरं आहे, हा जो माझा भ्रम आहे, तो घालवा” असं पू बाबा मागे लागले होते महाराजांच्या १९४२ साली. “वेळ आली की घालवू” म्हणाले महाराज. १९४४ सालच्या एप्रिल मध्ये बॉम्बस्फोट झाला मुंबईत आणि मुंबईतून पळापळ सुरु झाली. जवळजवळ पाऊण मुंबई खाली झाली. त्या वेळी पू बाबांचं बिऱ्हाड होतं हिंदू कॉलनीत दादरला. आपण या परिस्थितीत काय करावं असा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आणि दोघे पती-पत्नी याबद्दल महाराजांना विचारायला आले- “महाराज, या परिस्थितीत मी काय करू? हैदराबादला जाऊ का?” तसं महाराज म्हणाले, “केशवराव, मला असं वाटतं की तुम्ही इथे येऊन राहावं माझ्याजवळ. मी अशाकरता असं म्हणतोय की माझं जे होईल ते तुमचं होईल.” पू बाबांना फार आवडलं ते. पुढे महाराज म्हणाले, “वर दोन खोल्या रिकाम्या आहेत; त्यात तुम्ही येऊन राहावं असं मी सुचवतो.” आता महाराजांनी जबाबदारी घेतलीच होती. “महाराज, मी जरूर येतो” असं केशवराव म्हणाले. पण म्हणाले, “महाराज मी इथे येऊ कसा? म्हणजे समान केव्हा आणू? काय आणू?”, तेव्हा आधी महाराज म्हणाले, “एक दोन दिवसात समान आणावं” पण पुढे परत म्हणाले, “आपल्याला समान आणायचंच नाहीये! आता असं करायचं, कपड्यानिशी तुम्ही दोघांनी इथे यायचं. जी काही तुमची महत्त्वाची पुस्तकं असतील, ३-४ तेवढी घ्यायची आणि बाकीचा संसार लुटून टाकायचा!”
काय परीक्षा आहे ही! दृश्य जगाचा मोह – भान जे आहे ते लोपायला हा उपाय आहे. पू बाबांनी दुसरं तिसरं काही केलं नाही. गेले, त्यांची काय ३-४ महत्त्वाची पुस्तकं असतील ती घेतली आणि तसेच्या तसे दोघे नवरा-बायको मालाडला आले. गुरुआज्ञा अगदी तंतोतंत पाळली त्यांनी.
मात्र यायच्या आधी घर लुटवलं. हमाल बोलावले. जी.आय.पी. च्या स्टेशनवरून, सेन्ट्रल स्टेशन वरून हमाल बोलावले. समोर गरीब लोक राहात होते. त्यांना बोलावलं आणि घर लुटायला लावलं. १-१|| तासात सगळं लुटलं गेलं. मोकळं झालं सगळं. मग मालाडला आले आणि दोघेही नवरा-बायको महाराजांना भेटले. महाराजांना भेटल्यावर महाराजांना इतका काही आनंद झाला, “केशवराव, अहो, तुम्ही माझं ऐकलंत! आज मला इतका आनंद होतोय म्हणून सांगू! मला कसा आनंद होतोय सांगू का? एक उस्ताद असतो गाणं शिकवणारा. उस्ताद आपल्या शिष्याला गाणं शिकवीत असतो. गाणं शिकवता शिकवता त्यांना तान शिकवायची असते. एक तान, दुसरी तान, तिसरी तान अशा तो ताना शिकवीत असतो. हे शिकता शिकता एक तान शिष्य गुरूपेक्षाही चांगली घेतो. शिष्य तयारीचा असला ना तर असं होतं कधी कधी. आणि शिष्याने आपल्यापेक्षा चांगली तान घेतल्यावर उस्तादाला ज्या गुदगुल्या होतात, त्या मला आत्ता होतायत. आणि केशवराव, तुम्ही माझं का ऐकलंत सांगू का? मी माझं घर आधी लुटवलं आहे म्हणून तुम्ही माझं ऐकलंत. नाहीतर माझ्या वाणीला धारच नव्हती. मला तुम्हाला सांगायला तोंडच नव्हतं. मी आधी केले मग सांगितले. आता तुमचा दृश्यावरचा मोह जाईल. अनुभव घ्या. आता कसा लय लागतो ते बघा नामात!” केवढी कृपा झाली!
आता पू बापूसाहेबांनी बाबांना आणि वहिनींना काय विचारलं, “अहो, तुमचं धारिष्ट कसं झालं?” त्या दोघा नवरा-बायकोंनी त्यांना सांगितलं, “बापूसाहेब, सौदा फार स्वस्त होता. अहो, दृश्यावरचं भान जाणं ही काय कमी कृपा आहे का? त्याला घर लुटवणं ही प्राईस जुजबी होती. म्हणून त्याला आम्ही तयार झालो. असा मोका पुन्हा येणारे कधी? आता संधी आली याचाच अर्थ आज्ञा आहे आणि त्यांच्या कृपेने आम्ही ती संधी घेतली. आम्ही अगदी आनंदात आहोत!”
असे होते आपले पू बाबा! heart emoticon
मला जर कुणी तयार करील तर तूच करशील!
श्रीराम. एकदा बोलताना महाराज काय म्हणाले, प्रपंचात सारखं भान ठेवलं पाहिजे की हे जे सगळं सगळं आहे, जे घडतं आहे, ते मला शिकवण्याकरता आहे. हे केलं ना तर म्हणाले सगळं जे तत्त्वज्ञान आहे ते आचरणात येईल.
आचरणात येईल म्हणजे काय होईल असं विचारताच पहिल्या धडाक्याला त्यांनी सांगितलं बघा- त्यांचे शब्द सांगतो- "माझं वागणं असं पाहिजे की माझ्या गुरूला कमीपणा येता कामा नये!"
यावर आम्ही काय म्हटलं, "महाराज, हे आम्हाला कसं काय शक्य आहे? सारखंच आपल्या उलट वागतो आम्ही!" तेव्हा ते काय म्हणाले, "गुरूचं जर खरं सामर्थ्य असेल, किंवा कृपा म्हणा, अशाला तयार करणं याच्यातच आहे!" वा! कोण भेटेल असं तुम्हाला नाही का? मला सूरदासाचं पद आठवतं बघा- "कै मुख लै बिनती करूँ"... हे कोणचं तोंड घेऊन मी तुला विनंती करू?
पुढे महाराज काय म्हणाले, "याला सोपा उपाय आहे. गुरूला म्हणावं, "मी आहे हा असा आहे; पण मला तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. मला जर कुणी तयार करील तर तूच करशील. एवढी बुद्धी ठेवावी आणि त्याला सोडू नये. तो करतो!" 💗🙏
~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून
नाम स्थिर का होत नाही? नाम वाढत का नाही?
श्रीराम. नाम कसेही घेतले तरी आपले काम करतेच. हे जरी खरे असले, तरी "जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी" हे देखील खरे. आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो की 'माझे नाम वाढत का नाही?' पूज्य बाबांनी तर याचे कारण सांगून ठेवलेच आहे, की नाम सूक्ष्मातले असल्यामुळे त्याला लागणारी शक्ती ही अध्यात्मिक शक्ती आहे, बुद्धीची शक्ती नाही आणि म्हणूनच नाम घ्यावेसे वाटते पण होत नाही ही तक्रार बऱ्याच जणांची असते. त्याची अजून काही कारणे आहेत का?
{ हे सातारा येथील नाम-शिबिरात (संतछाया) संकलित झाले आहे }
नाम स्थिर का होत नाही? नाम वाढत का नाही?
कारण,
कारण,
१) नाम वाढावेसे वाटणे अनेकदा वरवरचे असते.
२) नाम घेणे यांत्रिक असते; भावपूर्ण नसते.
३) नाम घेण्यात सातत्य कमी पडते.
४) आजाराच्या प्रमाणात औषध नगण्य असते.
५) नाम हा भगवंताचा संकेत म्हणून घेत नाही.
६) नामाचे आपल्या जीवनातील स्थान / महत्त्व आपण वाढवत नाही.
७) नाम घेण्यात निःशंकपणा नाही.
८) नाम घेण्यापासून लौकिक अपेक्षा असतात.
९) नाम वाढण्याच्या आड कुणी काही असल्याची समजूत कायम असते.
१०) नामाला उपाधी लावतो.
११) इतर सत्कर्मे ओढवून घेतो.
१२) नामाच्या अनुभवाची अपेक्षा बाळगतो.
१३) नाम वाढण्याला अनुकूल कामे करत नाही.
१४) नाम वाढण्याला प्रतिकूल कामे कळत नकळत करतो.
१५) मौनाचा अभ्यास कमी पडतो.
१६) नाम घेण्यास सबबी सांगतो.
१७) तुलनेत घालवतो.
१८) 'मी आहे तसाच राहून' नाम वाढावेसे वाटते.
१९) नामाचा संपूर्ण अर्थ 'मी नाही तू आहेस' हे सतत लक्षात ठेवून नाम घेत नाही; व्यवहार करत नाही.
२०) नामाच्या साठवणीतून सतत उचल करीत असतो.
२१) सावधानता, अभ्यास, नम्रता कमी पडतात.
२) नाम घेणे यांत्रिक असते; भावपूर्ण नसते.
३) नाम घेण्यात सातत्य कमी पडते.
४) आजाराच्या प्रमाणात औषध नगण्य असते.
५) नाम हा भगवंताचा संकेत म्हणून घेत नाही.
६) नामाचे आपल्या जीवनातील स्थान / महत्त्व आपण वाढवत नाही.
७) नाम घेण्यात निःशंकपणा नाही.
८) नाम घेण्यापासून लौकिक अपेक्षा असतात.
९) नाम वाढण्याच्या आड कुणी काही असल्याची समजूत कायम असते.
१०) नामाला उपाधी लावतो.
११) इतर सत्कर्मे ओढवून घेतो.
१२) नामाच्या अनुभवाची अपेक्षा बाळगतो.
१३) नाम वाढण्याला अनुकूल कामे करत नाही.
१४) नाम वाढण्याला प्रतिकूल कामे कळत नकळत करतो.
१५) मौनाचा अभ्यास कमी पडतो.
१६) नाम घेण्यास सबबी सांगतो.
१७) तुलनेत घालवतो.
१८) 'मी आहे तसाच राहून' नाम वाढावेसे वाटते.
१९) नामाचा संपूर्ण अर्थ 'मी नाही तू आहेस' हे सतत लक्षात ठेवून नाम घेत नाही; व्यवहार करत नाही.
२०) नामाच्या साठवणीतून सतत उचल करीत असतो.
२१) सावधानता, अभ्यास, नम्रता कमी पडतात.
साधकाला मृत्यूचे निरोगी भान हवे!
श्रीराम. डॉ अप्पासाहेब आठवले यांनी पूज्य बाबांना विचारले, "तुमचे साधन काळातील काही अनुभव सांगा." पूज्य बाबा काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने म्हणाले की साधन करत असताना मला उपयोगी पडलेल्या काही गोष्टी सांगतो; त्या लक्षात ठेवा.
आता माझे वय झालेले आहे. मृत्यू केव्हाही येऊ शकतो. आता साधन करावयास थोडेच दिवस राहिले आहेत असे वाटू लागले, म्हणजेच मृत्यूचे निरोगी भान ठेवले की साधनाला जोर येतो. मृत्यूची तशी भीती नाही; पण I am counting my days.
मृत्यूची भीती वाटत नसली तरी आजार झाला तर साधन होणार नाही. परालीसीस झाला, स्मृती गेली असे काही होऊ शकते. गेल्या वर्षी गुडघ्यात पाणी झाले तेव्हा आठ दिवस झोप नव्हती. जागचे हलता येत नसे. घरातील बाकीची सर्व मंडळी झोपलेली असत. अशा वेळी केवळ नामानेच साथ दिली. त्यामुळे तेव्हापासून आता हे जास्त वाटू लागले आहे. आज हाताशी आहे तो दिवस खरा हे लक्षात ठेवून शक्य तितके जास्त साधन आजच केले पाहिजे!
~~ अध्यात्म संवाद ४
नामाच्या संगतीनं आणि त्याला सर्वोच्च मूल्य दिल्यानं प्रपंचाची बोच जाईल!
श्रीराम. एक दिवस गुरुदेव रानडे आंघोळीहून बाहेर आले. त्यांच्या भाच्यानी त्यांना सांगितलं की, सांगलीचा राजा पुस्तकासाठी (Mysticism in Maharashtra) पैसे द्यायला आलाय. गुरुदेव म्हणाले, "मी आंघोळीहून आल्यावर कशा अवस्थेत असतो, ते तुला माहीत नाही का? त्याला ९/९|| वाजता यायला सांग. १९४२ सालची ही गोष्ट; राजासमोर असं बोलायचं म्हणजे काय हो? पण साधनेची किंमत त्यापेक्षा मोठी आहे ना!
तुम्ही या मार्गाला लागता तेव्हा ते साधन प्राण आहे असं वाटलं पाहिजे. There should not be any compromise. कोणतीही तडजोड नाही! त्याकरता दृश्याचं प्रेम सुटलं पाहिजे. दृश्यात राहावं लागेल पण त्याची किंमत ओळखून राहायला हवं. जसं जर्मन तत्त्वज्ञ कान्ट म्हणतो, 'Duty for duty's sake'. कर्तव्य म्हणजे ज्या माणसाशी जो संबंध तितकीच त्यांना किंमत द्यावी. अमेरिकेला मुलं जातात; बोलावलं तरी येत नाहीत. तेव्हा वाईट वाटण्याऐवजी मी माझं कर्तव्य केलंय, ठीक आहे असं वाटलं पाहिजे. त्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण असेल तर चांगलंच. समाधान राहील. ईश्वरावर श्रद्धा असल्याखेरीज तुम्ही कर्तव्य कर्तव्यबुद्धीनं करूच शकणार नाही. व्यवस्था ठेवणारा देव आहे. देह आहे तोपर्यंत प्रपंच राहणारच. त्याची बोच जायला नामाची संगत ठेवायला हवी. संगत म्हणजे, भेटून गेलेल्या माणसाबद्दल जसं वाटतं, तसं नाम घेऊन झाल्यावर संगत झाली असं वाटतं का?
श्रीमहाराज म्हणतात, नाम हा माझा प्राण आहे, तर तुम्हाला तसं वाटतं का? सगळं मर्म तिथेच आहे! मुंबईला चोऱ्या पुष्कळ होतात. पाकीट जाऊ नये म्हणून आपण त्याची संगत कशी ठेवतो? तशी नामाची राहते का? इतर वेळेला सुद्धा 'ते आहेत' ही भावना असल्याशिवाय नामाची संगत घडणार नाही. त्यातलं मर्म-- "ज्याला मी पाहतो आहे असं वाटतं, त्याच्या हातून दुष्कर्म होणारच नाही!"
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
Monday, September 21, 2015
नाम हीच अंतकाळची वासना व्हावी!
श्रीराम. श्रीमहाराजांना जे आवडायचे नाही ते करू नये. त्यांना जे शोभेल व जे आवडेल असं वागायला हवं. त्याकरिता अखंड नाम घेणे हाच उपाय आहे आणि प्रार्थना करावी की 'मी नाम घेतोय' हा माझ्या मनाचा दोष काढून टाका. त्याने शांती वाढेल. प्रत्येक नामागणिक शांतीचा अनुभव येईल.
श्रीमहाराज अंतकाळ साधायचे म्हणजे, प्रपंचाची वासना मरताना समोर यायला लागली तर तिच्या जागी नामाची वासना घालायचे. तर मग आपण अखंड नामाचीच वासना ठेवली तर पुढच्या जन्मात डबल प्रमोशन देऊन नाम घ्यायला सोईचं होईल अशाच ठिकाणी जन्माला घालतील. या जन्मातल्या वासना पुढच्या देहाची वाट पाहत असतात. पण संचितातून फलोन्मुख झालेली कर्मे भोगायला आवश्यक असणारा देह तयार असतो. जोपर्यंत संचित सूक्ष्म आहे तोपर्यंत त्यात बदल करता येतो. पूर्वसंस्काराने मनाचे व्यवहार चालतील पण त्यानुसार वागावं की नाही ते आपल्या हातात असतं. माणसाला व्यवहाराकडे बघायची दृष्टीच बदलायला हवी; म्हणजे सृष्टीच वेगळी दिसेल.
नामाला सर्वोच्च मूल्य दिल्याने आपली दृष्टीच बदलते, Dimension च बदलून जातं. नामाशिवाय राहा म्हटलं तर ते आता शक्य नाही असं वाटतं!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
नामात नित्य नवा ताजेपणा हवा!
श्रीराम. नाम सवयीचे होता कामा नये. पूजा करताना कुठे आपले संपूर्ण लक्ष असते? तसे होऊ नये. त्यात नित्य ताजेपणा पाहिजे. कासेगांवकरांना नामाबद्दल सांगताना महाराजांना बोलवेना. त्यांचा घसा दाटून आला. इतके नामाचे महत्त्व आहे. भाऊसाहेब दर तास - अर्धा तासाने महाराज कोठे आहेत, काय करताहेत ते पाहून यायचे, तसे नामाचे अनुसंधान पाहिजे. गुरू देहात असताना त्याची सेवा करता येते पण ते देहात नसतानाही तोच भाव पाहिजे. त्याचबरोबर आपले आचरण आणि विचारही शुद्ध झाले पाहिजेत. वाईट बोलू नये. एकदा श्रीमहाराज म्हणाले, ज्या तोंडाने भगवंताचे नाव घ्यायचे त्याने अपशब्द उच्चारणे योग्य नाही. आपले मन आणि वाणी पवित्र पाहिजे. यासाठी ध्येयाची सतत आठवण- सावधानता हवी. रोज झोपण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे
नामदेवांची भक्ती आणि आपली!
श्रीराम. कृष्णदास नावाचा महाराजांचा एक भक्त वरचेवर महाराजांकडे (वाणी रूपात असताना) येत असे. त्याचे म्हणणे असे की, "नामदेवाने जसे श्रीविठोबास दूध पाजले, तसे माझ्या हातून प्यावे." श्रीमहाराज म्हणाले, "दोघांत फरक इतकाच की, देव दूध पितो याची नामदेवास खात्री होती; पण माझे हातून पीत नाही याचे दुःख होते. तुला देव दूध पीतच नाही पण माझेकडून त्याने प्यावे असे वाटते आहे. आपण कोणताही आग्रह न धरता अखंड त्याचे स्मरणात असावे यातच खरे कल्याण आहे. नामस्मरण करीत जावे." त्याप्रमाणे मग तो नामस्मरण करीत असे!
~ परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांचे आत्मवृत्त
गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!
गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा हा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!
अंधारिये राती उगवे हा गभस्ति |
मालवेना दीप्ति गुरुकृपा ||
तो हा कृष्ण हरि गोकुळा माझारी |
हाचि चराचरी प्रकाशला ||
आदि मध्य अंत तिन्ही झाली शून्य |
तो कृष्णनिधान गोपवेषे ||
निवृत्ति निकट कृष्णनामपाठ |
आवडी वैकुंठ वसिन्नले || heart emoticon
मालवेना दीप्ति गुरुकृपा ||
तो हा कृष्ण हरि गोकुळा माझारी |
हाचि चराचरी प्रकाशला ||
आदि मध्य अंत तिन्ही झाली शून्य |
तो कृष्णनिधान गोपवेषे ||
निवृत्ति निकट कृष्णनामपाठ |
आवडी वैकुंठ वसिन्नले || heart emoticon
~ रात्र अंधारी आहे; परंतु गुरुकृपेने अंधाऱ्या रात्रीदेखील सूर्य उगवला आहे. त्याचा प्रकाश कधीही मंद होत नाही. तो सूर्य म्हणजेच गोकुळीचा कृष्ण होय! तोच प्रकाशरूपाने चराचरामध्ये प्रकाशला आहे. या प्रकाशाच्या ठायी आरंभ, मध्य आणि अंत असे काहीच राहिले नाही. हा प्रकाशच गोपवेषात नटलेल्या कृष्णाचे निधान (घर) आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, या कृष्णनामाचा जप माझ्या जवळ आहे. या नामाच्या आवडीने जणू काय माझे जीवनच वैकुंठ झाले आहे!
नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व!
श्रीराम. नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व सांगणारा तुकोबांचा एक सुंदर आणि मार्मिक अभंग-
काय करू कर्माकर्म | बरे सापडले वर्म ||
होसी नामाच सारिखा | समजाविली नाही लेखा ||
नाही वेचावेच झाला | उरला आहेसी संचला ||
तुका म्हणे माझे | काय होईल तुम्हा ओझे ||
होसी नामाच सारिखा | समजाविली नाही लेखा ||
नाही वेचावेच झाला | उरला आहेसी संचला ||
तुका म्हणे माझे | काय होईल तुम्हा ओझे ||
~ आपल्याला माहीतच आहे की तुकोबांसारखी देवाशी सलगी क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्या अभंगांतून आपण त्याचा वारंवार प्रत्यय घेऊ शकतो. एक अविचल भक्तच अशी सलगी दाखवू शकतो जी दास्य भावातून सख्य भावाकडे वाटचाल करते. अशीच एक गोड सलगी या अभंगात-
भगवंता, मी कर्म आणि अकर्म यांचा विचार कशाला करू? कर्माचे व अकर्माचे जे मुख्य वर्म आहे- ते तुझे नाम- माझ्या हाती आले आहे! तुझे नाव दीनदयाळ आहे आणि त्या नावासारखाच तू दयाळू आहेस हे मी जाणतो. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्या नामाचा आश्रय घेतला, त्यांना तू त्यांच्या इच्छेप्रमाणे दिलेस आणि त्यांचे समाधान केलेस. तुझे नाम पूर्वी जे होते ते तसेच आत्ताही आहे. त्यात काहीही वजा झालेले नाही. तू जसा आहेस तसाच पूर्ण आहेस. तेव्हा माझा अंगीकार केल्याने तुला ओझे होणार आहे का? (तेव्हा तुझ्या नामाला जागून तू मला आपले म्हटलेच पाहिजेस!)
Similarity between the teaching of two saints- 2
आजच्या आपल्या अवस्थेमध्ये 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे बरोबर नव्हे! ~ श्रीमहाराज
I say, 'Thou art my Lord and I am Thy servant.' ~ Shri Ramakrishna Paramahans
~श्रीमहाराज~
श्रीराम. एका शास्त्रीबुवांनी श्रीमहाराजांना विचारले, "मी तुझा दास आहे असे सारखे म्हणत गेल्याने गुलामवृत्ति वाढणार नाही काय?" त्याऐवजी 'मी ब्रह्म आहे' असे आपण का म्हणू नये?' श्रीमहाराज म्हणाले, "ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो, खरा 'मी' कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्याजवळ खोट्या 'मी' चे प्राबल्य आहे. ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा 'मी' गेला म्हणजे खऱ्या 'मी' ला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या मी ला मारण्यासाठी भगवंताचे - जगाचे नव्हे - दास्यत्व पत्करणे फार अवश्य असते. आजच्या आपल्या अवस्थेमध्ये 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे देहबुद्धीला वाढवील. ते बरे नव्हे. 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे; म्हणून फक्त नाम घ्यावे! heart emoticon
श्रीराम. एका शास्त्रीबुवांनी श्रीमहाराजांना विचारले, "मी तुझा दास आहे असे सारखे म्हणत गेल्याने गुलामवृत्ति वाढणार नाही काय?" त्याऐवजी 'मी ब्रह्म आहे' असे आपण का म्हणू नये?' श्रीमहाराज म्हणाले, "ज्ञानमार्ग असो की भक्तिमार्ग असो, खरा 'मी' कोण आहे हे ओळखण्यासाठीच सर्व साधने असतात. आज आपल्याजवळ खोट्या 'मी' चे प्राबल्य आहे. ते नाहीसे करणे जरूर आहे. खोटा 'मी' गेला म्हणजे खऱ्या 'मी' ला कुठून बाहेरून आणण्याची जरूर नाही. तो प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वतःसिद्ध आहेच. म्हणून खोट्या मी ला मारण्यासाठी भगवंताचे - जगाचे नव्हे - दास्यत्व पत्करणे फार अवश्य असते. आजच्या आपल्या अवस्थेमध्ये 'मी ब्रह्म आहे' असे म्हणणे देहबुद्धीला वाढवील. ते बरे नव्हे. 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे; म्हणून फक्त नाम घ्यावे! heart emoticon
~Shri Ramakrishna~
There is a saying, 'I don't want to become sugar; I want to eat it.' Therefore, I never feel like saying, 'I am Brahman.' I say, 'Thou art my Lord and I am Thy servant.' My desire is to sing God's name and glories. It is very good to look on God as the Master and on oneself as His servant. Further, you see, people speak of waves as belonging to the Ganges but no one says that the Ganges belongs to the waves. The feeling 'I am He' is not wholesome. A man who entertains such an idea, while looking on his body as the Self, causes himself great harm. He cannot go forward in spiritual life; he drags himself down. He deceives himself as well as others. he cannot understand his own state of mind. Unless one has learnt to love God, he cannot realize Him. I never ask Divine Mother to give me anything. I pray to Her only for Pure Love- 'शुद्धा भक्ति!' heart emoticon
There is a saying, 'I don't want to become sugar; I want to eat it.' Therefore, I never feel like saying, 'I am Brahman.' I say, 'Thou art my Lord and I am Thy servant.' My desire is to sing God's name and glories. It is very good to look on God as the Master and on oneself as His servant. Further, you see, people speak of waves as belonging to the Ganges but no one says that the Ganges belongs to the waves. The feeling 'I am He' is not wholesome. A man who entertains such an idea, while looking on his body as the Self, causes himself great harm. He cannot go forward in spiritual life; he drags himself down. He deceives himself as well as others. he cannot understand his own state of mind. Unless one has learnt to love God, he cannot realize Him. I never ask Divine Mother to give me anything. I pray to Her only for Pure Love- 'शुद्धा भक्ति!' heart emoticon
नामाचा अभ्यास चिकाटीने करावा!
श्रीराम. साधनेत एक लक्षात ठेवणे जरूर आहे की आरंभापासून शेवटपर्यंत नामाशिवाय दुसरे काही करावे लागत नाही. काळ अनुकूल असो किंवा प्रतिकूल, साधकाने चिकाटीने नाम घ्यावे.
महाराजांपाशी एक कर्नाटकी मनुष्य येऊन राहिला. त्याचे इतर वागणे चार सामान्य लोकांसारखेच होते. परंतु नामस्मरणाच्या बाबतीत त्याने वैशिष्ट्य दाखवले. तो अहोरात्र नामस्मरण करीत असे. त्याच्या तोंडात नाम व हातात माला केव्हाही दिसे. काही दिवसांनी त्याच्या मनाला अत्यंत समाधान प्राप्त झाले. गोंदवल्यासच त्याचा अंतकाळ झाला. प्राण गेल्यानंतर देखील काही वेळ त्याचे ओठ, बोटे सारखी हलत होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे महाराजांनी एक मेणबत्ती घेऊन त्याचे थिजलेले डोळे लोकांना मुद्दाम दाखवले आणि म्हणाले, "याला म्हणावे अभ्यास! पूर्वाभ्यासाने देहाला इतकी सवय लागते की तो प्राणहीन झाल्यावर देखील ओठ बोटे हालू शकतात. मग मन तर सूक्ष्मच आहे. त्याला नामाची सवय लवकर लागेल. ती जर टिकवून धरली तर या जन्मीच काय पण पुढेदेखील ती कायम टिकेल!"
पण चिकाटी मात्र हवी!
आनंदसागरांची नामनिष्ठा जबर होती. लग्न करायचे त्यांच्या मनात नव्हते. गुरूंनी त्यांचे लग्न ठरवले, त्यावेळी त्यांना रडू कोसळले. लग्नाच्या दिवशी पहाटे तीन वाजता उठून त्यांनी गार पाण्याने स्नान केले आणि सकाळी सहा वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे मनापासून नामस्मरण केले! तसेच उदाहरण गुरुदेव रानडे यांचे. ज्या दिवशी एम ए ची परीक्षा होती, त्या दिवशी पहाटे उठून त्यांनी आपले रोजचे नामस्मरण पूर्ण केले. तसेच ज्या दिवशी त्यांनी देह ठेवला, त्या दिवशी देखील त्यांनी आपला नेम चुकवला नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहज-समाधी-सारांश)
वासना पायरी पायरीने शुद्ध करावी!
श्रीराम. कमी-जास्त प्रमाणात व चांगली वा वाईट वासना सर्वसामान्यांच्या मनात असतेच. पण ती अधिकाधिक प्रमाणात शुद्ध, सात्विक व उदात्त करण्याचा प्रयत्न माणसाने करावा असे सांगून श्रीमहाराज म्हणाले,
"पापवासना अथवा वाईट विचार मनात येत राहून त्यानुसार लगेच देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा, तामसी प्रकार होय. अशांच्या ठायी विवेक ही वस्तू अस्तित्वातच नसते.
त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल.
याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात त्यांच्या मनात वासना येतात त्या सर्व सात्विक, परहितकारक अशाच असतात; त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात.
सतत नामस्मरणात राहिले म्हणजे माणूस आपोआप या पायऱ्यांनी वर चढत चढत श्रेष्ठत्वास पोचतो!"
(हृद्य आठवणी)
Similarity between the teaching of two saints - 1
श्रीराम. रामाला साक्ष ठेवून सांगतो की माझ्याशी आपलेपणा ठेवा. मला आवडते म्हणून नाम घ्या. तुमच्या पापाचा भार मी घेतला अशी खात्री बाळगा. ते पाप पुनः करु नका, तुम्हाला रामाच्या चरणाशी नेण्याची हमी माझ्या कडे लागली.
नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगामध्ये असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल.
~~ श्रीमहाराज
तळमळीने आपण नाम घेतो का?
श्रीराम. एखाद्या परीक्षेची तयारी आपण कशी करतो? खाता जेवता उठता बसता अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो. परीक्षा केंद्रावर सुद्धा वाचन चालू असतं. चांगले गुण मिळावण्यासाठी किती कष्ट घेतो? हे दृश्यातलं असून सुद्धा! मग अदृश्य ईश्वर दर्शनाला किती तळमळ हवी? या तळमळीने आपण नाम घेतो का? असे झाल्यास भगवद्दर्शन दूर नाही!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (प्रवचन)
संत कबीराचा ईश्वर प्रेमाने मस्त असा एक दोहा!
हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या |
रहे आज़ाद या जग में, हमन दुनियासे यारी क्या? ||१||
रहे आज़ाद या जग में, हमन दुनियासे यारी क्या? ||१||
जो बिछुड़े है पियारेसे, भटकते दर ब दर फिरते |
हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या? ||२||
हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या? ||२||
खलक सब नाम अपने को, बहुत कर सर पटकता है |
हमन हरिनाम रांचा है, हमन दुनियासे यारी क्या ||३||
हमन हरिनाम रांचा है, हमन दुनियासे यारी क्या ||३||
न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े पियारेसे |
उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या? ||४||
उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या? ||४||
कबीरा इश्क का माता, दुईको दूर कर दिलसे |
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या? ||५||
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या? ||५||
~~ मी प्रेमामध्ये मस्त आहे. मला कशाची शुद्ध असली काय किंवा नसली काय? मी या जगात मुक्तपणे राहात असतो. मला जगाशी आसक्ती ठेवून काय करायचे आहे? ज्याचा आपल्या प्रियकराशी वियोग झालेला असतो, तो दारोदार भटकतो. पण माझा प्रियकर माझ्यामध्येच आहे, म्हणून मला कोणाची प्रतीक्षा करण्याचे कारणच नाही. सारी दुनिया आपले नाव व्हावे म्हणून धडपड करते. पण *** मी हरिनामावर अनुरक्त आहे ***. म्हणून मला दुनियेशी दोस्ती ठेवण्याचे प्रयोजन नाही. माझा प्रियकर माझ्यापासून क्षणभर सुद्धा वेगळा होत नाही. तसाच मीही माझ्या प्रियकरापासून कधीच वेगळा होत नाही. माझे त्याच्याशीच पूर्ण प्रेम जडले आहे. म्हणून मला बेचैन अवस्था माहीत नाही. कबीर सांगतात, मी हृदयातून द्वैत बाजूला सारले आणि भगवंताच्या प्रेमामध्ये मस्त झालो. जर नाजूक मार्गावर चालायचे असेल तर डोक्यावर मोठे ओझे घेऊन कसे चालेल? चालणार नाही!
गुरुभक्ती कशी असावी हे श्रीरामकृष्ण परमहंसांच्या शब्दात!
श्रीराम. अत्यंत एकनिष्ठ भक्ताला आपल्या गुरूविषयी प्रेम वाटेलाच, पण गुरूचा एखादा नातेवाईक अगर गुरूच्या गावचा एखादा मनुष्य भेटला, तरी एकदम गुरूची आठवण होऊन, त्यालाच गुरू म्हणून तो नमस्कार करील! भक्ताची गुरुभक्ति इतक्या उच्च अवस्थेला पोहोचली म्हणजे त्याला आपल्या गुरूत एकही दोष दिसत नाही. गुरू जे सांगतील ते त्याला प्रमाण. त्याची दृष्टीच तशी होऊन जाते. कावीळ झालेल्या माणसाला जसे सर्व काही पिवळेच दिसते, तसे त्याचे होऊन जाते.
गुरुभक्ति कशी असावी सांगू?
गुरू जसे सांगेल तसे लागलीच दिसू लागले पाहिजे. अशी भक्ति अर्जुनाची होती. एक दिवस रथात बसून अर्जुनाबरोबर श्रीकृष्ण सहज फिरत चालले असता मधेच आकाशाकडे पाहून म्हणाले, 'अहाहा! अर्जुना, हे पाहिलेस का? कसे एक सुंदर कबूतर उडत चालले आहे ते!' आकाशाकडे पाहून अर्जुन लागलीच म्हणाला, 'खरंच, कृष्णा, किती सुंदर कबूतर आहे हे!' पण पुन्हा श्रीकृष्ण वर पाहून म्हणाले, 'छे छे अर्जुना! अरे हे कबूतर नव्हे!' अर्जुन तिकडे पाहून पुन्हा म्हणाला, 'खरेच कृष्णा! अरे हे तर कबूतर दिसत नाही!'
आता आपण लक्षात घ्या की अर्जुन महान सत्यनिष्ठ, उगीच कृष्णाची खुशामत करण्यासाठी तर तो असे म्हणाला नाही! पण कृष्णाच्या शब्दावर त्याचा इतका विश्वास आणि भक्ति की, कृष्णाने जे काही सांगितले ते अर्जुनाला अगदी तसेच दिसू लागले!
अशा रीतीने गुरुभक्तिपरायण साधक अखेरीस अशा अवस्थेला जाऊन पोहोचतो की, त्या वेळी ही शक्ती त्याच्या स्वतःमध्येच आविर्भूत होऊन, त्याच्या मनातील सर्व संशयाचा उलगडा करून गूढ गूढ अध्यात्मिक तत्त्वे त्याला समजावून देते!
आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते!
श्रीराम. आपल्याला नामस्मरणाचे खरे महत्त्वच कळत नाही. नामस्मरण हाच खरा धर्म, हेच खरे कर्म आणि हीच खरी उपासना होय. नामस्मरणानेच आत्मदर्शन घडते यात शंकाच नाही. मनापासून नाम घेणे हेच साधकाचे खरे जीवन आहे. नामाची कृपा होणे हे भाग्यवंताचे लक्षण आहे. नामस्मरण करावे असे वाटणे हीच ती कृपा होय.
**** आत्मस्वरूप प्रकट होऊ लागले, म्हणजेच तोंडात नाम येते ****
म्हणून नामस्मरण हेच खरे तप होय!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (नामसमाधी : सहज-समाधी)
संताचा आनंद निर्मळ व निस्वार्थी असतो!
श्रीराम. श्रीमहाराजांना भेटायला गेले असता भेटणाराला तर आनंद होईच, पण त्याच्याहूनही अधिक आनंद त्यांनाच झाल्याचे दिसून येई. याचे कारण एका ज्येष्ठ भक्ताने विचारले असता ते म्हणाले, "आपण कितीही निर्मळ मनाने भेटायला गेलो, तरी आपली देहबुद्धी नष्ट झालेली नसल्यामुळे, प्रपंचातली काही अडचण-उणीव दूर व्हावी, निदान आहे ही सुस्थिती कायम राहावी, अशी एक चोरटी, सूक्ष्म इच्छा मनात कुठेतरी खोल दडलेली असतेच, त्यामुळे आपल्याला होणारा आनंद निर्भेळ, सात्विक, निरुपाधिक नसतो; वासनेने डागाळलेलाच असतो.
याउलट, येणारा प्रत्येक जीवात्मा बद्धावस्थेतून मुक्त व्हावा, त्याला भगवंताची भेट होऊन शाश्वत समाधान लाभावे, ही एकच सात्विक, निस्वार्थी तळमळ मनात असल्याने श्रीमहाराजांना होणारा आनंद निरुपाधिक, विशुद्ध प्रेमाचा, करुणेने ओतप्रोत असा असतो. आपल्यालाही सद्गुरूभेटीचा, संतदर्शनाचा असा आनंद हवा असेल, तर आपण अशा निर्मळ भावनेने गेले पाहिजे की माझ्या देहाचे आणि प्रपंचाचे काहीही होवो, मला भगवंताचे खरे प्रेम लागून जन्ममरणाचा फेरा चुकावा!"
(हृद्य आठवणी)
Friday, July 3, 2015
भगवंताची कृपा म्हणजे काय?
श्रीराम. भगवंताची कृपा म्हणजे संतांनी रचलेली संकल्पना नाही. त्यांच्या आत्मबुद्धीला घडलेले ते एक साक्षात दर्शन आहे. जीवनाकडे समग्रपणे पाहता आले - म्हणजे अहंकारशून्य होऊन पाहता आले - तर भगवंताची कृपा ही काय वस्तू आहे याचा अंदाज येतो. नामस्मरणाने ही समग्रपणाची दृष्टी नकळत प्राप्त होते. कृपापात्र माणसाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग आल्यावाचून राहात नाहीत. पण प्रत्येक प्रसंगामध्ये एक जबरदस्त कल्याणकारी शक्ती आपल्याला सांभाळते असा प्रत्यक्ष अनुभव त्याला येतो. जीवनामध्ये काहीही उलथापालथ झाली, तरी भगवंतापासून, त्याच्या नामापासून मन न चळणे ही कृपेची सर्वोत्तम प्रचीती होय. वासनेचा आघात क्षीण होणे, दृश्याला चिकटलेले मन तेथून सुटून भगवंताला तितकेच दृढपणे चिकटणे आणि भगवंताच्या नामाची गोडी उत्पन्न होणे यांमध्ये भगवंताच्या कृपेचे साधनी माणसाला दर्शन घडते. किंबहुना या दर्शनामध्ये नामस्मरणाचे फळ साठवलेले आहे असे म्हणणे अनुभवला अधिक धरून आहे.
भगवंताच्या कृपेचे भान प्राप्त झालेला साधनी माणूस नित्यकर्मे करताना सामान्य माणसासारखा दिसतो. परंतु लहान सहान प्रसंगामध्ये देखील "हा आपल्यातील नव्हे" असे निकटवर्तीयांच्या ध्यानात आल्यावाचून राहात नाही.
नाम घेणाऱ्याने हे ध्यानात ठेवावे की कृपेची जाणीव साधनी माणसाला भगवंताच्या अति निकट घेऊन जाते. त्यावेळी नामाची सांगत म्हणजे काय याचा अनुभव येतो. तेथे भगवंताची दिव्य वाणी अनाहतनादरूपाने ऐकायला येते. इतकेच नव्हे तर भगवंताच्या ऐक्यासनावर बसण्याचे भाग्य लाभते!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत)
तितिक्षा सा निगद्यते!!!
श्रीराम. माणसाचे मन विश्वमनाचा अंशच असल्याने त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती असते. लोकांचा द्वेष आणि निंदा करण्यात आपण विनाकारण तिचा व्यय करतो. म्हणून आपण तर कधी द्वेष किंवा निंदा करू नयेच पण कोणी आपली निंदा केली तर ती आनंदाने किंवा विनोदाने सोसावी. उदाहरणार्थ :
एक चांगला साधक रस्त्याने चालला होता. त्याची निंदा करणारा मनुष्य वाटेत भेटला. साधकाने मोठ्या प्रेमाने त्याचे स्वागत केले. निंदक बरोबर चालू लागून त्याची वाटेत तो निंदा करू लागला. मोठ्या प्रसन्नतेने साधकाने त्याचे बोलणे ऐकून घेतले. इतक्यात तो थांबला आणि निंदकाला म्हणाला, "मित्रा, तुला आणखी जे काही बोलायचे ते बोलून घे. मी येथे उभा राहतो. पुढे माझ्यावर प्रेम करणारे लोक राहतात. ते तुला त्रास देतील.." निंदक चुपचाप न बोलता निघून गेला.
मलिक नावाचा एक तपस्वी होता. त्याचे अंतःकरण लहान मुलाप्रमाणे सरळ होते. एके दिवशी तो रस्त्याने जात असता "ए बदमाष" म्हणून एका बाईने त्याला हाक मारली. अत्यंत नम्रतेने त्याने उत्तर दिले, "बाई, इतक्या दिवसात माझ्या खऱ्या नावाने हाक मारणारी तूच प्रथम भेटलीस. तू मला बरोबर ओळखलेस म्हणून आनंद वाटला. भगवंताला विसरून जगणे बदमाषीच आहे."
दक्षिणेत व्यंकटनाथ नावाचा मोठा भक्त होऊन गेला. तो फार विद्वान होता. त्याचा द्वेष करणाऱ्या मंडळींनी एक दिवस जुन्या जोड्यांची मोठी माळ त्याच्या दारात टांगून ठेवली. ती अशी टांगली की जो कोणी आतून बाहेर येईल त्याच्या डोक्याला ती बरोबर लागावी. व्यंकटनाथ जेव्हा बाहेर आला, तेव्हा त्याच्या डोक्याला ती लागली. ते पाहून सगळे हसले. पण अगदी शांतपणे व्यंकटनाथाने पुढील श्लोक म्हटला: "कर्मावलंबकाः केचित् केचित् ज्ञानावलंबकाः| वयं तु हरिदासानां पादरक्षावलंबकाः ||" म्हणजे- "काही लोक कर्ममार्गाने जातात, काही ज्ञानमार्गाने. पण आम्ही मात्र हरिदासांच्या म्हणजे भगवद्भक्तांच्या जोड्यांचे अनुयायी आहोत. आमच्यावर आज खरोखर भगवंताची कृपा झाली."
तात्पर्य- साधकाच्या अंगी विवेकाने आलेली नम्रता हवी. नम्रतेशिवाय कोणी संत होऊ शकत नाही; संत आणि नम्रता एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (सहजसमाधी)
नामाच्या अभ्यासानेच नामाचे प्रेम लागेल !!
एका नामधारकाने श्रीमहाराजांना विचारले की, 'लहान मुलाला जर चहाचे बोट लावले तर ते दुधाकडे दुर्लक्ष करते, कारण त्याला चहाची चटक लागते. तशी नामाची आम्हाला चटक आपण का लावीत नाही?'
श्रीमहाराज म्हणाले, 'प्रश्न मोठा मार्मिक आहे. पण तुम्ही दिलेला दाखला दृश्यामधील असल्याने तो नामाला तितकासा लागू पडत नाही. एका गृहस्थाला दोन मुली होत्या. दोघींत बरेच अंतर होते. थोरलीचे लग्न झाल्यावर पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी आली. तिला सुंदर मुलगा झाला. एके दिवशी तिची धाकटी बहीण रुसली. रुसण्याचे कारण वडिलांनी विचारले तेव्हा ती म्हणाली, 'तुम्ही ताईला बाळ दिले, मला दिले नाही.' यावर बाप काय म्हणेल?
तसे,
*** नामाच्या अभ्यासाने तुमची आतून वाढ होऊ द्या. तुम्ही आतून वयात या, म्हणजे नामाच्या गोडीचे बोट मला तुमच्या तोंडाला लावता येईल ***
(हृद्य आठवणी)
Subscribe to:
Posts (Atom)