Translate

Monday, September 21, 2015

संत कबीराचा ईश्वर प्रेमाने मस्त असा एक दोहा!

हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या |
रहे आज़ाद या जग में, हमन दुनियासे यारी क्या? ||१||
जो बिछुड़े है पियारेसे, भटकते दर ब दर फिरते |
हमारा यार है हम में, हमन को इंतजारी क्या? ||२||
खलक सब नाम अपने को, बहुत कर सर पटकता है |
हमन हरिनाम रांचा है, हमन दुनियासे यारी क्या ||३||
न पल बिछुड़े पिया हमसे, न हम बिछुड़े पियारेसे |
उन्हीसे नेह लागा है, हमन को बेकरारी क्या? ||४||
कबीरा इश्क का माता, दुईको दूर कर दिलसे |
जो चलना राह नाजुक है, हमन सर बोझ भारी क्या? ||५||
~~ मी प्रेमामध्ये मस्त आहे. मला कशाची शुद्ध असली काय किंवा नसली काय? मी या जगात मुक्तपणे राहात असतो. मला जगाशी आसक्ती ठेवून काय करायचे आहे? ज्याचा आपल्या प्रियकराशी वियोग झालेला असतो, तो दारोदार भटकतो. पण माझा प्रियकर माझ्यामध्येच आहे, म्हणून मला कोणाची प्रतीक्षा करण्याचे कारणच नाही. सारी दुनिया आपले नाव व्हावे म्हणून धडपड करते. पण *** मी हरिनामावर अनुरक्त आहे ***. म्हणून मला दुनियेशी दोस्ती ठेवण्याचे प्रयोजन नाही. माझा प्रियकर माझ्यापासून क्षणभर सुद्धा वेगळा होत नाही. तसाच मीही माझ्या प्रियकरापासून कधीच वेगळा होत नाही. माझे त्याच्याशीच पूर्ण प्रेम जडले आहे. म्हणून मला बेचैन अवस्था माहीत नाही. कबीर सांगतात, मी हृदयातून द्वैत बाजूला सारले आणि भगवंताच्या प्रेमामध्ये मस्त झालो. जर नाजूक मार्गावर चालायचे असेल तर डोक्यावर मोठे ओझे घेऊन कसे चालेल? चालणार नाही!

No comments:

Post a Comment