Translate

Saturday, October 3, 2015

गुरुसेवा म्हणजे काय?


श्रीराम. सर्व संत सांगतात, गुरुसेवा महत्त्वाची! पण गुरुसेवा म्हणजे काय?

महाराज म्हणाले, याचे उत्तर खूप सोपे आहे. गुरूला आवडेल ते केले म्हणजे गुरुसेवा झाली. आता प्रश्न आला, गुरूला काय आवडतं? एका भगवंताशिवाय गुरूला काहीच आवडत नाही. ते आपल्याला आवडलं की गुरुसेवा झाली!

महाराज पुढे म्हणाले, "आयुष्यातला थोडा काळ तरी असा घालवला पाहिजे की भगवंताकरिताच आम्ही जगतोय." कुणी नामाच्या वेळेला आला, तर त्याला सांगता आलं पाहिजे, की आत्ता माझ्या साधनेची वेळ आहे. यात लाज वाटता कामा नये. उगीच वेडेवाकडेपणा करू नये; पण खरंच असं वाटलं पाहिजे. त्याशिवाय साधन कसं होणार सांगा? सगळ्या अडचणीच आपण सांगत राहातो. असं करून चालणार नाही. गुरुसेवा अशी घडली पाहिजे!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून

No comments:

Post a Comment