Translate

Monday, September 21, 2015

नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व!

श्रीराम. नामस्मरणाचे महत्त्व आणि त्याचे भगवंताशी एकरूपत्व सांगणारा तुकोबांचा एक सुंदर आणि मार्मिक अभंग-
काय करू कर्माकर्म | बरे सापडले वर्म ||
होसी नामाच सारिखा | समजाविली नाही लेखा ||
नाही वेचावेच झाला | उरला आहेसी संचला ||
तुका म्हणे माझे | काय होईल तुम्हा ओझे ||
~ आपल्याला माहीतच आहे की तुकोबांसारखी देवाशी सलगी क्वचितच पाहायला मिळते. त्यांच्या अभंगांतून आपण त्याचा वारंवार प्रत्यय घेऊ शकतो. एक अविचल भक्तच अशी सलगी दाखवू शकतो जी दास्य भावातून सख्य भावाकडे वाटचाल करते. अशीच एक गोड सलगी या अभंगात-
भगवंता, मी कर्म आणि अकर्म यांचा विचार कशाला करू? कर्माचे व अकर्माचे जे मुख्य वर्म आहे- ते तुझे नाम- माझ्या हाती आले आहे! तुझे नाव दीनदयाळ आहे आणि त्या नावासारखाच तू दयाळू आहेस हे मी जाणतो. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी तुझ्या नामाचा आश्रय घेतला, त्यांना तू त्यांच्या इच्छेप्रमाणे दिलेस आणि त्यांचे समाधान केलेस. तुझे नाम पूर्वी जे होते ते तसेच आत्ताही आहे. त्यात काहीही वजा झालेले नाही. तू जसा आहेस तसाच पूर्ण आहेस. तेव्हा माझा अंगीकार केल्याने तुला ओझे होणार आहे का? (तेव्हा तुझ्या नामाला जागून तू मला आपले म्हटलेच पाहिजेस!)

No comments:

Post a Comment