Translate

Monday, September 21, 2015

गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!


गुरुकृपा आणि नामाचे महत्त्व विषद करणारा हा संत निवृत्तीनाथांचा एक गोड अभंग!
अंधारिये राती उगवे हा गभस्ति |
मालवेना दीप्ति गुरुकृपा ||
तो हा कृष्ण हरि गोकुळा माझारी |
हाचि चराचरी प्रकाशला ||
आदि मध्य अंत तिन्ही झाली शून्य |
तो कृष्णनिधान गोपवेषे ||
निवृत्ति निकट कृष्णनामपाठ |
आवडी वैकुंठ वसिन्नले || heart emoticon
~ रात्र अंधारी आहे; परंतु गुरुकृपेने अंधाऱ्या रात्रीदेखील सूर्य उगवला आहे. त्याचा प्रकाश कधीही मंद होत नाही. तो सूर्य म्हणजेच गोकुळीचा कृष्ण होय! तोच प्रकाशरूपाने चराचरामध्ये प्रकाशला आहे. या प्रकाशाच्या ठायी आरंभ, मध्य आणि अंत असे काहीच राहिले नाही. हा प्रकाशच गोपवेषात नटलेल्या कृष्णाचे निधान (घर) आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, या कृष्णनामाचा जप माझ्या जवळ आहे. या नामाच्या आवडीने जणू काय माझे जीवनच वैकुंठ झाले आहे!

No comments:

Post a Comment