श्रीराम. एकदा बोलताना महाराज काय म्हणाले, प्रपंचात सारखं भान ठेवलं पाहिजे की हे जे सगळं सगळं आहे, जे घडतं आहे, ते मला शिकवण्याकरता आहे. हे केलं ना तर म्हणाले सगळं जे तत्त्वज्ञान आहे ते आचरणात येईल.
आचरणात येईल म्हणजे काय होईल असं विचारताच पहिल्या धडाक्याला त्यांनी सांगितलं बघा- त्यांचे शब्द सांगतो- "माझं वागणं असं पाहिजे की माझ्या गुरूला कमीपणा येता कामा नये!"
यावर आम्ही काय म्हटलं, "महाराज, हे आम्हाला कसं काय शक्य आहे? सारखंच आपल्या उलट वागतो आम्ही!" तेव्हा ते काय म्हणाले, "गुरूचं जर खरं सामर्थ्य असेल, किंवा कृपा म्हणा, अशाला तयार करणं याच्यातच आहे!" वा! कोण भेटेल असं तुम्हाला नाही का? मला सूरदासाचं पद आठवतं बघा- "कै मुख लै बिनती करूँ"... हे कोणचं तोंड घेऊन मी तुला विनंती करू?
पुढे महाराज काय म्हणाले, "याला सोपा उपाय आहे. गुरूला म्हणावं, "मी आहे हा असा आहे; पण मला तुझ्याशिवाय दुसरं कुणी नाही. मला जर कुणी तयार करील तर तूच करशील. एवढी बुद्धी ठेवावी आणि त्याला सोडू नये. तो करतो!" 💗🙏
~ परमपूज्य बाबा बेलसरे यांच्या प्रवचनातून
No comments:
Post a Comment