श्रीराम. कमी-जास्त प्रमाणात व चांगली वा वाईट वासना सर्वसामान्यांच्या मनात असतेच. पण ती अधिकाधिक प्रमाणात शुद्ध, सात्विक व उदात्त करण्याचा प्रयत्न माणसाने करावा असे सांगून श्रीमहाराज म्हणाले,
"पापवासना अथवा वाईट विचार मनात येत राहून त्यानुसार लगेच देहाने कुकर्म घडणे हा सर्वात खालचा, तामसी प्रकार होय. अशांच्या ठायी विवेक ही वस्तू अस्तित्वातच नसते.
त्यापेक्षा वरच्या दर्जाचे ते की ज्यांच्या मनात वाईट विचार येतात पण त्यांना संयमाने आवर घालून ते कुकर्म ते प्रत्यक्षात घडू देत नाहीत. हा रजोगुणी प्रकार म्हणता येईल.
याहून श्रेष्ठ, सात्विक वृत्तीचे जे असतात त्यांच्या मनात वासना येतात त्या सर्व सात्विक, परहितकारक अशाच असतात; त्यात पापसंकल्पना मुळीच नसते. वासनांचा सर्वोच्च व शुद्ध सात्विक प्रकार म्हणजे सद्गुरू आणि भगवंत यांच्याखेरीज काहीही विचार मनात न येणे. संत व सिद्ध पुरुष हे असे असतात.
सतत नामस्मरणात राहिले म्हणजे माणूस आपोआप या पायऱ्यांनी वर चढत चढत श्रेष्ठत्वास पोचतो!"
(हृद्य आठवणी)
No comments:
Post a Comment