Translate

Saturday, October 3, 2015

साधकाला मृत्यूचे निरोगी भान हवे!


श्रीराम. डॉ अप्पासाहेब आठवले यांनी पूज्य बाबांना विचारले, "तुमचे साधन काळातील काही अनुभव सांगा." पूज्य बाबा काहीच बोलले नाहीत. थोड्या वेळाने म्हणाले की साधन करत असताना मला उपयोगी पडलेल्या काही गोष्टी सांगतो; त्या लक्षात ठेवा.

आता माझे वय झालेले आहे. मृत्यू केव्हाही येऊ शकतो. आता साधन करावयास थोडेच दिवस राहिले आहेत असे वाटू लागले, म्हणजेच मृत्यूचे निरोगी भान ठेवले की साधनाला जोर येतो. मृत्यूची तशी भीती नाही; पण I am counting my days.

मृत्यूची भीती वाटत नसली तरी आजार झाला तर साधन होणार नाही. परालीसीस झाला, स्मृती गेली असे काही होऊ शकते. गेल्या वर्षी गुडघ्यात पाणी झाले तेव्हा आठ दिवस झोप नव्हती. जागचे हलता येत नसे. घरातील बाकीची सर्व मंडळी झोपलेली असत. अशा वेळी केवळ नामानेच साथ दिली. त्यामुळे तेव्हापासून आता हे जास्त वाटू लागले आहे. आज हाताशी आहे तो दिवस खरा हे लक्षात ठेवून शक्य तितके जास्त साधन आजच केले पाहिजे!

~~ अध्यात्म संवाद ४

No comments:

Post a Comment