Translate

Friday, July 3, 2015

नामाच्या अभ्यासानेच नामाचे प्रेम लागेल !!


एका नामधारकाने श्रीमहाराजांना विचारले की, 'लहान मुलाला जर चहाचे बोट लावले तर ते दुधाकडे दुर्लक्ष करते, कारण त्याला चहाची चटक लागते. तशी नामाची आम्हाला चटक आपण का लावीत नाही?'

श्रीमहाराज म्हणाले, 'प्रश्न मोठा मार्मिक आहे. पण तुम्ही दिलेला दाखला दृश्यामधील असल्याने तो नामाला तितकासा लागू पडत नाही. एका गृहस्थाला दोन मुली होत्या. दोघींत बरेच अंतर होते. थोरलीचे लग्न झाल्यावर पहिल्या बाळंतपणासाठी ती माहेरी आली. तिला सुंदर मुलगा झाला. एके दिवशी तिची धाकटी बहीण रुसली. रुसण्याचे कारण वडिलांनी विचारले तेव्हा ती म्हणाली, 'तुम्ही ताईला बाळ दिले, मला दिले नाही.' यावर बाप काय म्हणेल?

तसे,

*** नामाच्या अभ्यासाने तुमची आतून वाढ होऊ द्या. तुम्ही आतून वयात या, म्हणजे नामाच्या गोडीचे बोट मला तुमच्या तोंडाला लावता येईल ***

(हृद्य आठवणी)

No comments:

Post a Comment