भगवंताच्या अस्तित्वाचे नित्य व सूक्ष्म अनुसंधान टिकवण्याचा अभ्यास करावा लागतो. वास्तविक हृदयातील भगवंत कोठे जात नाही किंवा कोठून हृदयात येत नाही. तो केवळ हरवल्यासारखा किंवा लपल्यासारखा झालेले आहे. त्याच्या स्मरणाने त्याच्या असण्याची प्रभावी जाणीव निर्माण करण्यासाठी गुरूने सांगितलेले साधन करायचे असते. आपण स्वतः आहोत त्यापेक्षा सुद्धा भगवंत आपल्या जवळ आहे. त्याला दृष्टीआड न होऊ देण्यास "तो मला हवा" असे सारखे वाटावे लागते. उग्र हवेपणाच्या अंगी मोठे सामर्थ्य असते. त्या सामर्थ्याने मनाची सारी यंत्रणा भगवंताचा शोध घेण्यामध्ये गुंतून जाते. मन असे गुंतले की माणूस भगवंताला अखंड सन्मुख राहतो. यासच अनुसंधान असे म्हणतात.
नित्यानित्य विवेकाला प्राधान्य देऊन या अनुसंधानाचा अभ्यास केला तर ज्ञानमार्ग होतो. निस्वार्थी प्रेमाला प्राधान्य देऊन त्याच अनुसंधानाचा अभ्यास केला तर संतांना प्रिय असलेला भक्तिमार्ग होतो.
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताचे अनुसंधान- साधनेचा प्राण)
श्री राम जय राम जय जय राम । श्री राम समर्थ ।
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम
ReplyDeleteश्रीराम जय राम जय जय राम ॥
ReplyDelete