Translate

Tuesday, February 3, 2015

पूज्य बाबांची श्री बापूसाहेबांनी सांगितलेली एक गोड गोष्ट !


श्रीराम. एकदा मी (श्री बापूसाहेब मराठे) पूज्य बाबांना विचारलं, "भगवंत फार लांब आहे. इतका तो लांब आहे की मानवी प्रयत्नांनी आपल्या आणि भगवंताच्यात जे अंतर आहे ना, ते काटलं जाईल असं नाही असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. मात्र हे खरं का?" तर म्हणाले, "हो अगदी खरं." मी म्हटलं, "मग अगदी खरं म्हटलं तर आमची गाठ कधीच पडायची नाही देवाबरोबर, हे ही आलं त्याच्या बरोबर."

तर म्हणाले, "असं नाहीये. गंमत काय आहे सांगू का? तुम्ही जेव्हा एक पाऊल टाकता तेव्हा तुमचे सद्गुरू तिकडून दोन पावलं टाकत येत असतात. भगवंत काय करतो? सद्गुरूला तिकडून दोन पावलं टाकून जायला सांगत असतो." किती सुरेख आहे!

म्हणजे काय, तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे; म्हणजे तिकडून दोन पावलं पडतील सद्गुरूची. म्हणजे दोन तृतीयांश अंतर सद्गुरू कापेल आणि एक तृतीयांश अंतर तुम्ही कापणारात, मग आता काय अवघड आहे? आणि म्हणून गाठ पड़ते. म्हणून आत्मज्ञान होतं, सद्गुरूकृपा होते!

~ पूज्य बापूसाहेब मराठे यांच्या प्रवचनातून

1 comment:

  1. ।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।

    ReplyDelete