तादात्म्य होणं ही अवस्था फार महत्त्वाची आहे. परमात्म्यासंबंधीचा भाव स्थिर व्हायला हवा. तुम्ही जन्माला आलात ते तुमचं नाव बरोबर घेऊन आलात का? तुमच्या आईबापांनी नाव दिलं, ते सारखं तुमच्या कानावर पडल्यामुळे तिन्ही अवस्थांमध्ये ते स्थिर झालं. तुम्हाला गाढ झोपेत हाक मारली तरी तुम्ही जागे होता. तसंच आपण एखादी कल्पना घट्ट धरली, त्याच्याशी तादात्म्य झालो की ती साकार झालीच पाहिजे. हा विश्वाचा नियम आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी किती जन्म श्रीकृष्णाचं चिंतन केलं असणार? सुरुवातीला ते अस्थिरच असणार. पण नंतर ते म्हणाले, "पांडवांशी सदाकाळी कृष्ण राहिला जवळी | ज्ञानदेवा हृदयकमली तैसाचि स्थिरावला ||" हा आनंदमय परमात्मा त्यांच्या हृदयात स्थिर झाला, म्हणून ते म्हणाले, "अवघाचि संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||" त्यांच्या हृदयात स्थिर झालेला श्रीकृष्ण त्यांना सबंध त्रिभुवनात दिसायला लागला. असं भगवंताचं - सद्गुरूंचं स्मरण होईल.
गुरूने मला जे नाम दिलं आहे ते सुरुवातीला अस्थिरच राहणार. ते जेव्हा स्थिरावेल, तेव्हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी त्याला आपला गुरूच दिसेल. हे तादात्म्य साधणं हे आपलं ध्येय पाहिजे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ८ वा)
।। श्री राम जय रा।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।म जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।
ReplyDelete