श्रीराम. एके दिवशी असं झालं की मी गोंदवल्यात बसलो होतो आणि एक गोव्याचा मनुष्य आला. तो अंगानं चांगला होता पण कमरेखाली पार लुळा होता. दोन माणसांनी धरून त्याला आणला. त्याच्याबरोबर त्याची आई आणि बायको होती. मी त्याच्या बायकोला विचारलं की बाई, तू बी.ए. बी.एड. शिक्षिका आहेस, तू याला पसंत कसं केलेस? ती म्हणाली, याला पाहिल्यावर हा माझा आहे असं वाटलं!
तसं अर्जुनानं श्रीकृष्णाला पाहिल्याबरोबर त्याला हा माझा आहे, असं वाटलं. बस, संपलं. हे परमार्थातलं भाग्य आहे लक्षात घ्या! तिथे संशय नाही. इतकं व्हावं भगवंताचं की त्यालाच आपल्याशिवाय चैन पडू नये. हे खरं प्रेम! विवेकानंद जर आले नाहीत, तर रामकृष्णांना चैन पडत नसे. हा आपलं ज्ञान घेण्यास पात्र आहे याचा आनंद सद्गुरुंना फार मोठा असतो.
याला एकच आवश्यक असतं. कर्तेपणा गेला, आता केवळ तूच असा भाव आला की गुरू कडेवर घेतो! शिष्याची हार ही गुरूची जीत असते!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचन)
No comments:
Post a Comment