श्रीराम. साधना करताना जी शक्ती साठते त्याची गंमत अशी आहे, की त्या शक्तीला विरुद्ध काही आलं – त्या शक्तीस्वरूपाच्या उलट काही मध्ये आलं तर ती शक्ती नाहीशी होते. आपली शक्ती – भगवंताच्या स्मरणाची शक्ती सूक्ष्म आहे. त्याच्या उलट स्थूल गोष्टी आहेत. त्या सूक्ष्मात जर स्थूल मिसळलं तर मिळवलेली शक्ती नाहीशी होते. आपल्याला शिकायचं काय आहे, तर जग हे परमात्मस्वरूप आहे. “कै ऐशी स्थिती येईल माझ्या अंगा| अवघे देखे जन ब्रह्मरूप||” सगळीकडे तोच आहे अशी माझी स्थिती व्हायची आहे. यासाठी आवश्यक काय आहे, तर सबंध जग निर्दोष पहायचंय. दोष पाहणं त्याच्या उलट.
म्हणून मी जर नामस्मरण करून निंदा केली तर शक्तिपात होतो. आलं ना लक्षात? समजा तास दोन तास उत्तम जप झालेला आहे आणि मग बाहेर आल्यावर तुमची सून काय करते, तुमच्याशी नीट वागत नाही का? तुमचा मुलगा काय करतो, अहो अलीकडे काळ बिघडलाय, हे झालं की तासभर केलेला जप हवा होऊन जातो. याशिवाय जर एखाद्या माणसाचा द्वेष केला तरी हेच होणार. अहो, परमात्मस्वरूपाला प्रेमाशिवाय काही चालत नाही!
आमच्या लहानपणी आम्ही काळ-काम-वेगाची उदाहरणं शिकलो. त्यात काय असे? एक पाण्याचा हौद आहे. त्याला वरून दोन तोट्या पाणी सोडतात आणि खालून चार तोट्या पाणी रिकामं करण्याच्या आहेत. काय होईल? पाणी साठेल का? फक्त ओल राहील. तसं नाम घेऊन जर अशा गोष्टींमध्ये वाया घालवला तर केवळ थोडीशी ओल राहील; फार तर पुढच्या वर्षी गोंदवल्याला दर्शनाला यावं एवढी इच्छा राहील; पण त्यापुढे साधनात पाऊल पडणार नाही. हे असं होऊ देऊ नका. शक्तीपातापासून साधकाने फार जपणं आवश्यक आहे! आणि म्हणूनच मौनाचं अतिशय महत्त्व आहे!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (प्रवचन उत्सव १९९०)

Shriram. . Thodkyat kay tar
ReplyDeleteMaunam sarvartha sadhanam. .
।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।
ReplyDelete