Translate

Monday, February 2, 2015

साधकाला येणारे तीन अतींद्रिय अनुभव --


बहुधा असे होते की पूर्वजन्मीच्या पुण्याईने अथवा आत्मानात्मविवेकाने अथवा सद्गुरूंच्या शब्दाने भगवंताच्या अस्तित्वाची श्रद्धा बुद्धीत असते. पण त्या श्रद्धेला भावनेची जोड असत नाही. भगवंताच्या अस्तित्वाबद्दल संशय नसणे आणि तो आहे असे प्रत्यक्ष वाटणे यात फरक आहे. म्हणून **मी आहे हे जितके निःसंशयपणे वाटते तितके तो भगवंत आहे असे वाटणे हा सर्वात पहिला व मोठा मौल्यवान अनुभव आहे.** भगवंताच्या अस्तित्वाबद्दलची ही निष्ठा साधनेचा प्राण आहे असे म्हणणेच योग्य होईल.

दुसरा अनुभव असा की साधनी माणसाला आतून भगवंताची आज्ञा होते. आतून त्याचे मार्गदर्शन होते. या आज्ञेला आतला आवाज - Inner Voice असे म्हणतात. हा आवाज अतींद्रिय असतो आणि याच्या उलट जाणे अशक्य असते. साधनी माणसाच्या साधनावर आतील आवाजाची स्पष्टता आणि आवृत्ती अवलंबून असते. अशा माणसाला जीवनामध्ये समस्या उरत नाही.

तिसरा अनुभव असा की भगवंत आपला सांगाती आहे अशी साक्षात प्रचीती येते. त्याचा बाहेर न दिसणारा सहवास घडतो. साधनी माणूस त्याच्या सहवासात सर्व कर्मे करतो. त्याचा सहवास इतका तृप्त करतो की आणखी काही मिळवायचे उरत नाही. म्हणून भगवंताचा सहवास लाभलेल्या साधनी माणसाला काही मागण्याची वासनाच उरत नाही!

~~ परमपूज्य बाबा बेलसरे (भगवंताच्या नामाचे दिव्य संगीत)

1 comment:

  1. ।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।।। श्री राम जय राम जय जय राम ।।

    ReplyDelete