श्रीराम! आपल्याकडे बायकांमध्ये Matching ची कल्पना निघाली आहे. कपडे, चपला, पर्स, दागिने हे सगळे एकाच रंगाचे पाहिजेत. बरोबर आहे, पण मग आपलं मन सुद्धा त्या शरीराला Matching नको का? कसं पाहिजे, जसं बाहेरचं सौंदर्य आहे, तसं मन आत सुद्धा सुंदर पाहिजे. पण हे सुद्धा अपुरं आहे.
यापुढचं सत्य जे आहे ते धर्माचं किंवा परमार्थाचं सत्य आहे आणि हा मार्ग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितला. खरी मनुष्याची जिज्ञासा सत्यशोधनाची आहे. ही तृप्त केव्हा होईल? इंद्रियांच्या सुखाने होणार नाही, विज्ञानाच्या मार्गाने होणार नाही. इंद्रिय तृप्ती तर फार भयंकर गोष्ट आहे. ती सावचोरांची संगत आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एखादा गोड पदार्थ तुम्ही खाल्लात तर वाटतं काय गोड पदार्थ आहे, पण त्यात विष मिसळलेलं असेल तर? तोच गोड पदार्थ तुमचा जीव घेईल. तसं आज मला या इंद्रियांचं सुख गोड वाटतं पण माझा जो Ultimate Consciousness आहे, सत्याची जी खरी जाणीव आहे, ती जाणीव हे इंद्रिय सुख देखील बोथट करतेच करते.
तुमची इंद्रियं काही काल भोग भोगल्यानंतर थकतात. इंद्रियांची मर्यादा ठरलेली आहे. त्याला Height of Sensibility असं म्हणतात. तुम्ही गोड खा; काही कालानंतर तुमच्या जिभेच्या पेशी थकतात आणि अधिक खाणं नको म्हणतात. सगळ्या इंद्रियांचं असंच आहे. इंद्रिय सुख हे खरं सुख नाही, तो सुखाचा भ्रम आहे. याचं शिक्षण महाराज फार छान देत. मंडळी सर्व पानावर बसलेली असायची. भात वाढलेला असायचा, तूपही वाढलेलं असायचं. पण महाराज काही जेवायला उठायचे नाहीत. उगीच पाच-दहा मिनिटं उशिरा जेवायला बसायचे. एक काका फडके म्हणून गृहस्थ होते. ते महाराजांशी नेहमी जरा जास्तच बोलायचे. त्यांनी एकदा महाराजांना विचारलं की आपण असं का थांबता? तर महाराज म्हणाले, "अरे, तुम्ही रोज ऊन ऊन अन्न घरी खाताच ना? त्या अन्नाची चव कमी करायला, तुमची चव कमी व्हायला असं केल्याशिवाय तुम्ही कसे तयार होणार?"
मन असं सांभाळणं हे आपलं पथ्य आहे; त्याशिवाय आपली नामस्मरणात हवी तेवढी प्रगती होणार नाही, ही खात्री बाळगा!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी खंड ३ रा)
Shriram.
ReplyDeleteKeval aaplyala paramarthat gooodi watavi ya uddeshya ne, Maharajanchyi khatpat challeli aahe.. Parantu aaplya kadun tyanna apekshit wagne, parmartha anusarne ghadat nahi. .
Ekach prarthana. .
Nehmi Baba mhantat tase,
Ki, Rama la sangave,
tu je karshil te mala manya aahe..
mag te changle aso kinwwa waiet.
Tyat majhe ch hiit aahe. .
Shriram samartha.
Aum namah shivay.
||श्रीराम समर्थ||
Deleteमहाराजांच्या इच्छेप्रमाणे आपण नामात राहण्याचा प्रयत्न करूयात. त्यानेच त्यांना आवडेल असे सतत वागण्याची बुद्धी होईल यात शंका नाही!
ll श्री राम जय राम जय जय राम llll श्री राम जय राम जय जय राम llll श्री राम जय राम जय जय राम llll श्री राम जय राम जय जय राम llll श्री राम जय राम जय जय राम llll श्री राम जय राम जय जय राम ll
ReplyDelete