प्रारब्धाच्या सिद्धान्तावर चर्चा चालू असताना बरेच लोक हा प्रश्न विचारतात - जर मनुष्याला प्रारब्धाचे इतके बंधन आहे तर मग साधन देखील प्रारब्धावर अवलंबून असले पाहिजे, त्यात प्रयत्नाचे महत्त्व आहे किंवा नाही? हा प्रश्न जेव्हा श्रीमहाराजांना विचारला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे अक्षरशः सर्व वेदांताचं सार आहे!
ते म्हणाले, ***"जोवर कर्तेपण आहे तोवर प्रयत्न श्रेष्ठ, कर्तेपण गेलं की प्रारब्ध श्रेष्ठ!"***
नाम घेताना तुमच्या सर्व काळज्या चिंता यांपासून तुम्ही मुक्त होता का? की एखादी गोष्ट कशी होणार असे तुमच्या मनाला वाटत असते? हे जोवर आहे तोवर "नाम सद्गुरू करवून घेतील" ही लबाडी आहे. साधनात कष्ट हवेतच.
किंबहुना ज्याचे मीपण खऱ्या अर्थाने राहणार नाही तो असल्या शंका काढणार नाही. ज्याला खरी भगवंताची तळमळ लागली तो दुसऱ्या कोणत्या भानगडीत न पडता साधनालाच लागेल!!!!
~~ परमपूज्य बाबा बेलसरे (ज्ञानेश्वरी प्रवचन)
No comments:
Post a Comment