श्रीराम. समजा, चोवीस तास जळणारा एक दिवा आहे. त्याची ज्योत सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री शांतपणे अखंड तेवत राहते. त्याचप्रमाणे नाम सिद्ध झाले म्हणजे साधकाच्या अंतर्यामी ते अनुस्यूतपणे चालू राहते. त्याच्या अंतरी नामाची धारा अखंडपणे आत्मसागरात पडत राहते. त्यामुळे तो साधक आत्मस्वरूपाशी इतका समरस होतो, की स्वतःच्या देहाकडे व जीवनाकडे तो अत्यंत वेगळेपणाने पाहू लागतो. या परकेपणाने पाहण्यास साक्षीभाव असे म्हणतात. ही फारच रम्य अवस्था असते.
अशा अवस्थेमध्ये स्थिर झालेल्या साधकाच्या जीवनात एक विलक्षण गोष्ट आढळते. तो वागताना माणूस म्हणूनच वागतो. पण त्याच्या वागण्यात नित्य आत्मा आणि अनित्य अनात्मा - म्हणजे दृश्याचा पसारा - यांच्यामध्ये एक लय आढळतो. व्यवहाराशी संबंध नसतो, तेव्हा तो अंतर्मुख होऊन आत्मलीन होतो; परंतु जरूर असते तेव्हा तो बहिर्मुख होऊन दैनंदिन कर्मे यथासांग करतो. तो स्वतः कमालीचा समाधानी असल्याने त्याच्या सहवासात माणसे दुःख विसरतात आणि पुनःपुन: सहवास लाभला तर माणूस आत्मस्वरूपाच्या शोधाकडे पूर्णपणे वळतो!
~ परमपूज्य बाबा बेलसरे (साधकाच्या अभ्यासाची रूपरेषा)
Naam Siddha Hone Sathi Kaay Karave???/
ReplyDeleteश्रीराम. सद्गुरूंकडून किंवा त्यांच्या पादुकांवर नाम घ्यावे. असे नाम सिद्ध नामच असते, कारण त्यात सद्गुरूंची संपूर्ण शक्ती साठवलेली असते. असे नाम घेतल्यानंतर ते शक्ती स्वरूप आणि सिद्ध नाम आहे, या दृढ भावनेने नाम जपावे!
Delete