Translate

Tuesday, September 23, 2014

साधनेतला शक्तिपात (Very Important for Sadhakas) --- पूज्य बाबा बेलसरे

भगवंताच्या स्मरणाची आपली शक्ती सूक्ष्म आहे. त्याउलट स्थूल आहे. साधनेने सूक्ष्म झालेले आपले मन पुन्हा स्थूलात गेले की शक्तिपात झाला. यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असेल तर सबंध जग निर्दोष पाहायचे आहे, कारण जग परमात्म-स्वरूप आहे. त्याउलट दोष पाहणे आहे. तेव्हा मी जर नामस्मरण करून निंदा केली तर शक्तिपात होतो. तासभर जप केला, बाहेर येऊन दुसऱ्याच्या घराच्या भानगडीत लक्ष घातलं, जग कसं बिघडलंय यावर चर्चा केली की तासभर केलेला जप हवा होऊन जातो. हे इतकं सूक्ष्म आहे की आपल्या लक्षात येत नाही. परमात्मस्वरूपाला प्रेमाशिवाय काही चालत नाही. त्यामुळे जर एखाद्याचा द्वेष केला, म्हणजे परमात्मस्वरूपाच्या उलट वागलो, साधनावर पाणी पडलंच. हे कसं होतं—लहानपणी आपण काळ-काम-वेगाची गणितं शिकायचो. त्यात उदाहरण असायचं- एक हौद आहे. त्याला वरून दोन तोट्या पाणी भरायच्या आहेत आणि खाली चार तोट्या पाणी रिकामं करायच्या आहेत. म्हणजे जरी वर पाणी भरत असेल तरी खालून चार तोट्या सोडल्यावर काय होईल सांगा? पाणी राहणार नाही; फक्त ओल राहील. त्याप्रमाणे केलेला जप पूर्ण वाया जाणार नाही, पुढच्या वर्षी पुन्हा उत्सवाला जावं इतकी भावना राहील पण याच्या पुढे जाणार नाही. हे कशासाठी समजून घ्यायचं? आपलं चुकतं कुठे हे समजण्यासाठी! म्हणून निंदा केली, द्वेष केला, की गेलं सगळं. काळजी तर महाराजांना अजिबात पसंत नव्हती. जो मनुष्य काळजी करतो, त्याच्या जवळ राहायला मला कष्ट होतात असे ते म्हणत. कारण, काळजी म्हणजे परमात्मस्वरूपाविषयीच संशय आणि भीती. परमार्थाचं मूळच जिथे निर्भय होण्यामध्ये आहे, तिथे काळजीला स्थान असेलच कसं?


असा आपला शक्तिपात सारखा होत असतो. खाऊ नये ते खाणं, वासना, दुसऱ्याचा द्वेष- निंदा करणं, किंवा मोहाला बळी पडणं, या सगळ्या शक्तीपाताच्या तोट्या आहेत. म्हणून साधकाला थोडसं व्रतस्थ राहणं जरूर आहे. आचरण सांभाळलंच पाहिजे. आपली वृत्ती इतकी सात्विक, सरळ, निष्कपट, केल्याशिवाय हृदयात सद्गुरू किंवा भगवंत कसा साठणार?     

Friday, September 12, 2014

आपले ज्ञान किंवा लौकिक खऱ्या ज्ञानाच्या आड येऊ देऊ नका ~ परमपूज्य बाबा बेलसरे Don't let the formal education and societal position get in the way of real dnyaana! ~ Paramapoojya Baba Belsare


सद्गुरूने सांगितलेले साधन जितके सामान्य मनुष्यास जमेल तितके ज्यांच्याजवळ जास्त विद्या, धन किंवा मान मरातब असेल त्यांस जमणार नाही. याचे कारण सामान्य माणूस शंका काढत बसत नाही व सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून साधन करतो. जितकी विद्या जास्त तितक्या शंका अधिक. ब्रह्मानंद बुवांसारखे अधिकारी शिष्यच त्या योग्य होत. त्या काळचे षटशास्त्री म्हणून लौकिक असलेल्या या महात्म्याने नामाला आपली जीभ विकली. त्यानंतर शास्त्र चर्चा करण्यास आलेल्यांना ते सरळ नाही म्हणून सांगत. ही जीभ मी नामाला विकली आहे असे म्हणत. असा मीपणा त्यागून जो विद्वान नामाच्या पाठीमागे लागेल त्यालाच ते साधेल; अन्यथा विद्या वा ज्ञान हे आड येण्याचीच शक्यता जास्त !


(The way a common man can devote himself to Saadhana, a person with more education, money or respect in the society cannot. A common man is not doubtful and has utter faith in Sadguru's preaching. More the formal education, more are the doubts. Only great satshishyas like Brahmanand Buwa can do it. He was revered in those days for his in-depth study of shastras. But he literally sold his tongue (vaani) for Naama. Whoever used to insist on discussions on those spiritual scriptures, he used to deny fiercely, saying he has sold his tongue to Naama. Only if the so-called acclaimed people become egoless and go behind Naama, it's possible for them. Else, formal education or intelligence may prove detrimental in this path!) 

शिष्याचे पंच-प्राण कोणते? ~ परमपूज्य बाबा बेलसरे

||श्रीराम समर्थ||


Tuesday, September 9, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १३ –

नाम— 


१३) नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही.

~~ श्रीराम. शास्त्रप्रचीती, गुरुप्रचीती आणि आत्मप्रचीती या तिन्ही कसोट्यांवर जे उतरते ते खरे ज्ञान. आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची वचने या तिन्ही कसोट्यांवर पुरेपूर उतरतात असे त्यांचे अनेक शिष्य वरचेवर सांगतात. “नाम” हा माझा प्राण म्हणणारे श्रीमहाराज नामरूप होते आणि त्यामुळेच नाम हे आनंदरूप आहे हे ते ठामपणे सांगू शकले. महाराज अनेक ठिकाणी “शांती”, “आनंद” आणि “समाधान” हे एकाच अर्थाने वापरतात. तेव्हा नाम हेच शांतीरूप आणि समाधानरूप आहे यात शंका नाही.

त्यांना समजले पण मग आम्हाला हे का समजत नाही? असा प्रश्न साहजिकच उद्भवतो. महाराजांना काही जणांनी विचारले, नामात लक्ष लागत नाही, काय करावे? महाराजांनी प्रतिप्रश्न केला, “तुमचे लक्ष कशात लागते?” त्यावर काही लोक म्हणाले, “कशातच लागत नाही”. मग महाराज म्हणाले, तुमचे कशातच लक्ष लागत नाही, मग नामात लागत नाही हे साहजिकच आहे. आणखी काही लोक म्हणाले, “काही गोष्टीत (उदा.- करमणुकीच्या साधनांत) आमचे लक्ष लागते; पण नामात लागत नाही.” मग महाराजांनी पुन्हा विचारले, “त्या गोष्टीत का लागते? कारण त्याची तुम्हाला आवड आहे म्हणून!” तीच आवड नामात आली की नामातही लक्ष लागेल.” ही आवड नामात येण्यास उपाय कोणता? तर नाम घेणे, मनापासून नेटाने घेणे हाच त्यावर उपाय आहे.

आपले नाम dry- कोरडे होते. कारण आपण नामाच्या अर्थाकडे लक्ष देत नाही, असे पूज्य बाबा सांगतात. नाम म्हणजे माझा सदगुरुशी – भगवंताशी असलेला थेट दुवा आहे, नाम घेणे म्हणजे जगद्व्याप्त परमेश्वराला आळवणे, त्याला आठवणे आणि “मी तुझा आहे” हे मनात म्हणणे होय. मुख्यतः नाम मध्यमेतून पश्यंती वाणीत गेले की हा अर्थ जास्त स्पष्ट होतो. आणि हे नाम घेत गेले की स्वतःचे स्वतःलाच कळते. तेव्हा बाकीची व्यवधाने थोडी का होईना बाजूला सारून “मी मनापासून नाम घेईन” हा निश्चय व्हावा लागतो. कित्येक लोक सांगतात की नाम घेतल्याने आमचा “Stress” (आज हा परवलीचा शब्द झाला आहे) खूप कमी झाला आहे. आतूनच शांत वाटते. ही नामाची शक्ती आहे. जे नाम प्रत्यक्ष ईश्वर आहे ते जपल्यावर दृश्याच्या पलीकडील शांतीचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही असे सर्व संतांनी छातीला हात लावून सांगितले आहे. तेव्हा त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास ठेवून नामाशी थोडे तरी तादात्म्य पावण्याचा अनुभव येवो हीच श्रीचरणी प्रार्थना! 

Monday, September 8, 2014

परमपूज्य बाबा बेलसरेंची निरासक्ती आणि नामाचे निरतिशय प्रेम – Non-attachment of Paramapoojya Baba Belsare and his amazing love for Naama—



(अध्यात्म-संवादातून)— बाबांचा वाढदिवस म्हणून आम्ही बाबांसाठी काही भेटवस्तू घेऊन त्यांच्याकडे गेलो. काहीशा नाराजीने ते म्हणाले, “कोणी सांगितला हा उपद्व्याप तुम्हाला?” पुढे म्हणाले, “खरं सांगतो, मी घरात राहणारा संन्यासी आहे. मागे दादरहून मालाडला आलो तेव्हा तिथले सगळे सामान विकून टाकले. पुस्तके मात्र घेऊन आलो. तेव्हा तुम्ही नाही त्या (भेटी देण्याच्या) फंदात पडू नका. मला आवडते ते करा. तुम्हाला नामाचे व श्रीमहाराजांचे प्रेम लागू द्या. ते अजून का लागत नाही, म्हणून माझा जीव तळमळतो; तेव्हा तेवढे करा. मी तुमचा अनादर करतो असे समजू नका; पण तेवढे नाम घ्या म्हणजे मला सगळे पावले!  

 (Excerpt from Adhyatma-Samvaad)—It was Baba’s birthday; so we had gone to meet him carrying a small gift for him. Little upset, he said, “Who told you to do this?” Later he said, “Frankly speaking, I am a Sannyasin living in home. When I came to Malad leaving Dadar years back, I sold all the belongings over there, except the books. Therefore, don’t try to give such things to me. Instead it would be better if you do what I love. May you develop love for Naama and Shri Maharaj. I feel the agony why don’t you develop the same yet! Please do not think that I am disrespecting you; but chant Naama so that I will get everything!

Friday, September 5, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन १२ --

नाम-- 

१२) 'मी ब्रह्म आहे' या अनुभवातसुद्धा मीपण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. 

~~ नामाच्या बाबतीतली श्रीमहाराजांची अत्युन्नत भावना आपण सगळे जाणतोच. त्या सर्व भावनांमध्ये "Par excellence" म्हणता येईल असे हे बोधवचन आहे. यातून महाराजांना अध्यात्मामध्ये- साधनामध्ये "मीपणाची" जाणीव गळून पडणे किती महत्त्वाचे वाटत होते हे समजून येते. मी रामाचा दास आहे असे गर्वाने सांगणाऱ्या महाराजांना तुकोबांप्रमाणे "अद्वैती तो नाही माझे समाधानतू देव मी भक्त ऐसे करी" असे वाटत होते ह्यात नवल ते काय. 

नाम हे सर्व दृश्याच्या पलीकडे आहेएवढेच नव्हे तर नाम म्हणजेच ओंकार, नामातूनच हे विश्व निर्माण झाले हे महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे. अदृश्य ईश्वराला जेव्हा हे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा झाली तेव्हा जे स्फुरण आले ते म्हणजे नाम! तेव्हा नाम सगळ्याच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच ते अनादी अनंत आहे! ईश्वर म्हणजेच नाम आणि नाम म्हणजेच ईश्वर! त्यामुळेच नाम सगळ्याच्या पलीकडे आणि मोक्षाचे – मुक्तीचे द्वार आहे; किंबहुना नामात राहणे हीच मुक्ती होय!

यामध्ये अजून एक मुद्दा स्पष्ट होतो, तो म्हणजे जोवर अनुभव आहे तोवर द्वैत आहे. त्यामुळे “मी ब्रह्म आहे” हा अनुभव येतो आहे तोवर द्वैत आहे. अनुभवरूप होणे आणि नामरूप होणे हे एकच आहे. श्रीमहाराज नामरूप होते. केवळ जगाला नामाचे महत्त्व सांगण्यासाठीच त्यांचा जन्म होता आणि त्या एकाच ध्येयाने ते आयुष्यभर आणि त्यानंतरही झटले. अशी महती असणारे नाम घेताना परमपूज्य बाबा बेलसरे म्हणत त्याप्रमाणे “नाम घेताना आपण काहीतरी अमूल्य वस्तू जपतो आहोत असा भाव ठेवून घ्यावे” हे वाक्य साधकाने प्राणापलीकडे जपले पाहिजे.


Thursday, September 4, 2014

ध्यान कसे करावे? (How should we meditate?) ~ परमपूज्य बाबा बेलसरे

।।श्रीराम समर्थ।।

Once a man asked Shri Maharaj, “How should we meditate?” Shri Maharaj said, “The way we drink water upon feeling thirsty! See the image of God or Sadguru again and again and try to fix it deep within!” ~ Paramapoojya Baba Belsare


Wednesday, September 3, 2014

श्रीमहाराजांचे बोधवचन ११ -

||श्रीराम समर्थ|| 
नाम –

११) आयुर्वेदाने रोग मुळापासून जातो. पण त्याला वेळ लागतो. तसे नामाने वेळ लागेल पण सर्व रोग मुळापासून जाईल. इंग्रजी औषधाने रोग वरवर नाहीसा होतो किंवा इंजेक्शन दिल्याने दुःखाची जाणीव कमी होते, पण रोग आत असतोच. तसे इतर साधनाचे आहे.

~~ श्रीराम. नामाचे महत्त्व सांगताना जी अनेक उदाहरणे महाराज देत त्यातील हे एक महत्त्वाचे उदाहरण. मनुष्य परमार्थाला लागतो तो रोगाचे- भवरोगाचे निर्मूलन होण्यासाठी. ह्या भवरोगाला कारण असते ते माणसाचे मन- त्याचे विकार- त्याच्या भगवंताशिवाय असणाऱ्या वृत्ती. जोवर या बाबींवर नियंत्रण येत नाही, तोवर रोगाचे उच्चाटन अशक्य. “मन एव कारणं बंधमोक्षयोः” असे म्हणतात ते याच कारणासाठी. हे मन बदलणे ही प्रक्रिया सुरु झाली म्हणजे माणूस परमार्थाला लागला असे म्हणता येईल. “नाम” हे असे साधन आहे, जे यावर रामबाण औषध आहे. इतरत्र भटकणाऱ्या मनाला आवर घालण्यासाठी नाम हे आयुष्याचे सर्वोत्तम मूल्य झाले पाहिजे असे परमपूज्य बाबा बेलसरे अनेक ठिकाणी सांगतात.

वर म्हटल्याप्रमाणे नाम हे मुळापासून बदल घडवून आणणारे असे एकमेव साधन आहे. नाम हे भक्तिमार्गाचे मर्म आहे. ज्ञानमार्गामध्ये हा बदल माणसाला स्वतःच्या मनावर आहार-विहार यांच्या संयमाने बळजबरीने आणावा लागतो. त्याशिवाय ज्ञानमार्ग पुढे चालू शकत नाही. भक्तिमार्गात- नाममार्गात मात्र जेव्हा भगवंताच्या प्रेमाने भिजून जाऊन भक्त त्याला आवडीने पुकारतो- नाम घेतो- तेव्हा त्याचे मन आपोआप त्या धारेमध्ये डुंबू लागते आणि मनाची दृश्याची खेच कमी होते.


यासाठी पूज्य बाबा बेलसरेंनी एके ठिकाणी पाणी आणि अग्नी याचे उदाहरण दिले आहे, जे इथे अतिशय प्रयुक्त आहे. पाणी देखील स्वच्छ करते, त्यात “बदल” (change) घडवते. अग्नी हा जाळून टाकतो आणि रूपांतर (transformation) करतो. म्हणून “नाम” हा अग्नी आहे! हिंदू वेदांमध्ये अग्नीला अतिशय महत्त्व आहे. ऋग्वेदातला पहिलाच मंत्र अग्निमंत्र आहे. तेव्हा असा हा नामरूपी अग्नी मनुष्याचे विकार जाळून टाकतो आणि विकारग्रस्त प्राण्याचे सत्पुरुषात रूपांतर करतो. याचे अजून एक कारण म्हणजे आयुर्वेद जसा पूर्वापार एकाच तत्त्वावर आधारित आहे, तसे नाम हे अनादी अनंत आहे. त्यात बदल नाही, वाढ नाही- घट नाही. असे जे कधीही न बदलणारे असते तेच मनुष्याच्या अंतःकरणाचा ठाव घेऊ शकते आणि त्याच्यात पारमार्थिक परिवर्तन करू शकते. मुळापासून रोग हटवणारा आयुर्वेद आणि नाम यांची यास्तव महाराजांनी समानता दर्शिविली आहे. कदाचित ज्ञानमार्गात लवकर आढळणारी सिद्धी, अनुभव नाममार्गात दिसणार नाहीत, किंवा त्याला वेळ लागेल; परंतु, जे साधेल ते कायमचे असेल ह्यात शंका नाही! 

Tuesday, September 2, 2014