Translate

Wednesday, December 31, 2014

आरोग्यपूर्ण अध्यात्मिक साधनेसाठी पूज्य बाबांनी सांगितलेले आरोग्यवर्धक कषाय !!

परमपूज्य बाबा बेलसरे हे अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगणारे होते. साधकाने स्वतःच्या तब्येतीची काळजी नीट घेतली तरच त्याला मनासारखे साधन करणे शक्य होईल याबद्दल त्यांचा कटाक्ष होता. अनेक प्रवचनांतून आपण सर्वांनी ते योग्य आहारावर किती भर देत हे पाहिलेच आहे. त्याच एका प्रवचनात ते या आरोग्यवृद्धी करणाऱ्या कषाय पेयाबद्दल माहिती देतात. हे कषाय अत्यंत गुणकारी असून पचनशक्ती, भूक, निद्रा, उत्साह वर्धन अशा अनेक बाबतीत उपयोगी आहे. सत्पुरुषाने सांगितलेल्या या पेयाचा आपणा सर्वांना फायदा मिळावा आणि निरोगी अध्यात्मिक जीवन जगण्यासाठी त्याचा आपण उपयोग करून घ्यावा यासाठी इथे देत आहे – (A “Kashaya” recipe given by Poojya Baba Belsare that helps improve one’s health and aids in betterment of Paramarthik sadhana.)
कषाय साधन व कृती (Ingredients and Recipe of Kashaya)
1) धणे १०० ग्रॅम (Coriander seeds – 100 gram)
2) बडीशेप ५० ग्रॅम (Saunf / fennel seeds – 50 gram)
3) जिरे २५ ग्रॅम (Cumin seeds – 25 gram)
4) बाळंतशेपा ५० ग्रॅम (Dill seeds – 50 gram)
5) गोखरू २५ ग्रॅम (Small caltrops – 25 gram)
6) वावडिंग २५ ग्रॅम (Embelia ribes or false black pepper – 25 gram)
7) मेथी १० ग्रॅम (Fenugreek seeds – 25 gram)
8) सुंठ १० ग्रॅम (दमा असल्यास) (Dry ginger powder – 10 gram, if one has asthma or bronchitis problem)
9) ज्येष्ठमध २० ग्रॅम (खोकला असल्यास) (Mulethi / Liquorice – 20 gram if one has frequent cough)
हे सर्व पदार्थ एकत्र करून थोडेसे लालसर रंगावर भाजावेत. गार झाल्यावर मिक्सर मधून काढावेत. कषाय तयार करताना चहा सारखेच करायचे आहे. 3/४ कप पाण्यात १/२ किंवा १ चमचा साखर आणि १ चमचा ही पावडर घालून उकळी आणणे. उकळी आल्यावर गाळून थोडेसे दूध घालणे.
Mix all the ingredients and roast till they become slightly reddish brown. Let it cool. Grind them together. Preparing kashaya is very similar to tea making. Add ¾ cup of water, ½ to 1 spoonful of sugar and 1 spoon of Kashaya powder. Let it boil. Strain it and add little milk

1 comment:

  1. या आरोग्यवर्धक कषाय मध्ये ७ नं.वर (7) मेथी १० ग्रॅम (Fenugreek seeds – 25 gram) असे दिलेले आहे.नेमके किती घ्यायचे १० की २५ ग्रॅम ?

    ReplyDelete